क्राईम

बबन गित्तेने वाल्मिक कराडवर केला या कारणामुळे केला जिवघेणा हल्ला?

बीड :- सोमवारी सकाळी बीड जिल्हा कारागृहात दोन गटांमध्ये तुफान राडा झाला असून, या गोंधळात संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुले यांच्यावर हल्ला झाला. यानंतर फरार असलेला बबन गित्ते याने थेट सोशल मीडियावर धमकी दिल्याने बीडमध्ये पुन्हा टोळीसंघर्षाची शक्यता निर्माण झाली आहे
वाल्मीक कराडवर तुरुंगात जीवघेणा हल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुले हे दोघे नाश्त्यासाठी बॅरेकमधून बाहेर आले असताना त्यांच्यावर अचानक हल्ला झाला. हा हल्ला महादेव गित्ते आणि अक्षय आठवले या दोघांनी केला असून, ते गीत्ते टोळीशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. या घटनेला कारण ठरलेली जुनी दुश्मनी पुन्हा उफाळून आल्याची माहिती आहे.

या प्रकाराबाबत भाजप आमदार सुरेश धस यांनीही संकेत दिले असून, तुरुंगातील वाढती गुन्हेगारी आणि टोळी गटांचे वर्चस्व पाहता परिस्थिती गंभीर बनली आहे. तुरुंगातच आरोपींवर प्राणघातक हल्ला होणं ही कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने धोक्याची घंटा मानली जात आहे.
बबन गित्तेची सोशल मीडियावर धमकी-
हल्ल्यानंतर फरार असलेल्या बबन गित्तेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत थेट धमकीच दिली आहे. ‘अंदर मारना या मरना सबकुछ माफ है’ असे लिहित त्याने फेसबुकवर आपला फोटो टाकत भविष्यातील हिंसाचाराची सूचकवाणी दिली आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.
बबन गित्ते हा सरपंच बापू आंधळे यांच्या खून प्रकरणात आरोपी असून, तो गेल्या काही महिन्यांपासून फरार आहे. त्याचं वाल्मीक कराडशी जुनं वैर असून, त्याच्याचमुळे आपल्यावर खूनाचा आरोप आल्याचा त्याचा दावा आहे. त्यामुळेच गित्ते गँगच्या सदस्यांनी तुरुंगातच वाल्मीकवर हल्ला केल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. यामुळे बीडमध्ये पुन्हा टोळीवादाचे वातावरण तयार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button