शैक्षणिक
‘लालपरी’ने प्रवास करणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी
महाराष्ट्र राज्य बस परीवहन महांडळाचा अनोखा निर्णय

मुंबई:- एसटी बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या बरीच मोठी आहे गावखेड्यात अजूनही प्रवासी एसटी बसवर अवलंबून आहे.तर, काही ठिकाणी शाळेत जाण्यासाठी गावातील विद्यार्थी एसटी बसचा वापर करतात. अशाच विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
काही लहान गावात विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी एसटी बस शिवाय कोणताच पर्याय नसल्याचे पाहायला मिळते.अशाच विद्यार्थांसह बसने प्रवास करणाऱ्यांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
आता शाळेतच मिळणार एसटीचा पास
एसटीने प्रवास करणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांना आता शाळेतच एसटी बसचा पास मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने शालेय विद्यार्थ्यांसाठी हा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर राज्यातील विद्यार्थ्यांना पास काढण्यासाठी लांबलचक रांगेत उभं राहण्याची गरज पडणार नाही.



