
बीड:- मनोज जरांगे हा एक फाटका माणूस आहे, भले तो कायदेपंडित नसेल पण तो निस्वार्थी अन प्रामाणिक आहे म्हणून मराठा समाजाचा कोण्या इतर राजकीय व्यक्तीपेक्षा मनोज जरांगे या माणसावर प्रचंड विश्वास आहे. लोकसभेच्या निकालात मनोज जरांगे फॅक्टर हा मराठवाडा तसेच राज्यातील कमीत कमी 12 लोकसभेच्या जागेवर चालला, जरांगे म्हटले तसं लोकांनी सत्ताधारी उमेदवार पाडले
मराठवाड्याच्या हिशोबाने जर तुम्ही पाहिले तर परभणी अन धाराशिव हे दोनच खासदार महाविकास आघाडी कडे होते. 2019 ला बाकीच्या मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार लाख-दोन लाख मतांनी आपटले होते. 2024 लोकसभेचा निकाल लागला, अनेक लोकसभा मतदारसंघात 2019 ला लाखों मतांनी पडलेले त्या त्या पक्षाचे उमेदवार यावेळेस लाखभर लीड घेऊन निवडून आले, ओमराजे अन संजय जाधव यांचे लीड तर 2019 च्या दुप्पट झाले. हे कसे झाले ? याचा कोणी विचार केला नसेल. हे होण्यासाठी मनोज जरांगे हा फाटका माणूस कारणीभूत आहे. जर भाजपला 10 मराठा व्यक्ती मतदान करत असतील तर मनोज जरांगे यांच्यामुळे त्यातील 7 ते 8 व्यक्तींनी यावेळेस भाजपला मतदान न करता ते मतदान महाविकास आघाडी ला केले, अन भाजपच्या कपाटनीतीला धडा शिकवला..
आजही मनोज जरांगे या माणसाला संपवायला भ्रष्ट, कोट्याधीश राजकारणी एकत्र येऊन विरोध करत आहेत. कोणी आपले प्यादे पुढे करत आहे अन त्या माणसाची बदनामी करत आहेत. पण जेवढं हि लोकं मनोज जरांगे विरोधात जातील तेवढी विस्थापित जनता मनोज जरांगे यांच्या बाजूने जाईल. भाजपवाले लोकसभेतून काही शिकले नाहीत, विधानसभेत हि असाच दणका येथील विस्थापीत, फाटके लोकं त्यांना देतील, तेव्हा कळेल
मनोज जरांगे या माणसाची जेवढी थट्टा उडवाल, जेवढं त्याला ट्रोल कराल, जेवढं त्याच्या विरोधात जाल त्याच्या दुप्पट भाजपचे नुकसान होणार. भाजप अन मित्रपक्षाच्या नेत्यांचे स्टेटमेंट असेच येत राहिले तर त्याचा कमीत कमी 100 विधानसभा मतदारसंघात फक्त जरांगेमुळे तोटा झालेला दिसेल. लोकसभेचे ताजे उदाहरण आपल्या सर्वांच्या समोर आहेच
मनोज जरांगे पाटील हा व्यक्ती हा गरीब कुटूंबातुन आलेले नेतृत्व आहे ते आज जे विनाकारण विरोध करत आहेत ते कोन आहेत ते बघा सत्तेच्या जोरावर फुकटचे आरक्षण व गुत्तेदारी दादागिरी दोन नंबरचे धंदे करून पैसेने माजलेले बोकडे आहेत
त्यामुळे यांच्याकडे लक्ष देऊ नका फक्त विधान सभेची वाट बघा एकदा या मस्ती खोर भाजपला दणका दिलाय अजून एकदा चांगला दणका देऊन सत्तेतुन पायउतार करा मग कळेल गुत्तेदारीच्या मस्तीच्या मस्तीत कोन कोन माजलेले माकडे आहेत
शांतता रॅलीमधे सहभागी होऊन शांततेने दणका देऊ
आगपाखड करुन दहन होत आसते ते आज दिसत आहे
घ्या जाळुन
वैभव कोकाट गेवराई



