शैक्षणिक

भाटूंबा येथील २५ तरुणांनी घडवला इतिहास ज्ञानेश्वर चौरे यांनी केला सत्कार

शासनाच्या विविध खात्यामधे झाली नियु्क्ती

 

केज:-तालुक्यातील भाटुंबा या गावच्या पंचवीस तरुण-तरुणींनी आपले कौशल्य कोणाला लावून मेहनत करून अभ्यास करून शासकीय निमशासकीय केंद्रीय स्तरावरील नौकरी मिळवली आज अनेक युवक रोजगार नाही रोजगार नाही असं म्हणत असताना या तरुणांनी मागील सहा महिन्यात एकाच गावातील २५ तरुण-तरुणींनी नोकरी मिळाल्याची पाहायला भेटले व भाठुंबा या गावचे नाव मोठे केले गावातील नेते श्री ज्ञानेश्वर चौरे यांनी दिवाळीतील सणाच्या  व आमावस्याच्या निमित्ताने या सर्व युवक युवतींचा सत्काराचा  व फराळाचा  कार्यक्रम आयोजित केला होता व यामध्ये या तरुणांचा सत्कार करून गावातील पुढील तरुणांसमोर कष्ट करण्याची व जिद्द बाळगण्याचे नवीन प्रेरणा दिले

भाटुंबा गावातील नोकरी मिळालेल्या तरुण-तरुणींचे नावे पुढीलप्रमाणे लक्ष्मीकांत सुनील कापरे कृषी सहाय्यक रोहित रामकिसन धपाटे स्टाफ नर्स मुंबई परमेश्वर एकनाथ रणदिवे लाईनमन मीनाक्षी गोरख चौरे स्टाफ नर्स शितल महादेव चौरे स्टाफनर्स जागृती अंकुश धपाटे हर्षदा महादेव जोगदंड , वर्षा किरण चौरे अभियंता रामेश्वर राजेभाऊ रणदिवे युनियन बँक कर्मचारी क्रांती संभाजी करपे स्टाफ नर्स सुदर्शन मन्मथ तपसे आरोग्य सेवक सुजित पृथ्वीराज कापरे पोलीस प्रतीक्षा बन्सी जोगदंड , मालती बाळासाहेब जोगदंड स्टाफ नर्स तेजस्विनी धर्मराज जोगदंड अंगणवाडी सेविका अशोक प्रकाश राऊत आरोग्य विभाग सुहास संतोष चौरे निमशासकीय लुपिन कंपनी प्रोडक्शन आकाश दत्तात्रय धपाटे अजित अशोक चौरे इंजिनिअर प्रवीण वामनराव पाटील इलेक्ट्रिकल ऑपरेटर शुभांगी कुलदीप धपाटे समुदाय आरोग्य अधिकारी रेवती अमोल तारडे , प्रवीण मधुकर कापरे बँक ऑफिसर प्रदीप मधुकर कापरे लाईनमन असे विविध विभागातील कर्मचारी म्हणून कर्मचारी म्हणून या सर्वांनी आपले कर्तुत्व सिद्ध केले गावचे नाव उंचावले म्हणून ज्ञानेश्वर चौरे यांनी या सर्व युवकांचा सत्कार करून एक नवा पायावर पाडला व पाठीवर कौतुकाची थाप मारली यावेळी  अंबाजोगाईचे बबन (भैया) लोमटे सुनील केंद्रे संजय चौरे  प्राध्यापक सतिष मस्के सुंदर तपसे यांच्यासह केजचे पत्रकार व गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button