अत्यंत दुःखद बातमी… केज येथील व्यापारी बापूराव सिंगन यांचे सुपुत्र किशोर सिंगन यांचे पुणे येथे अल्पशा आजाराने निधन; आज चिंचोली फाटा येथे अंत्यसंस्कार

केज (प्रतिनिधी):केज शहरातील सुप्रसिद्ध व्यापारी, तिरुपती मशीनरीचे संचालक तथा रोटरी क्लब ऑफ केजचे सदस्य बापूराव सिंगन यांचे सुपुत्र किशोर बापूराव सिंगन यांचे बुधवारी रात्री पुणे येथे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. तरुण वयात आलेल्या या आकस्मिक आघातामुळे केज शहरात, व्यापारी वर्गात व सिंगन परिवारामध्ये गाढ शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, किशोर सिंगन यांच्या डोक्याच्या रक्तवाहिन्यांमध्ये अचानक बिघाड झाल्याने त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यांना तातडीच्या उपचारासाठी सुरुवातीला अंबाजोगाई, त्यानंतर लातूर आणि प्रकृती अधिक गंभीर असल्याने पुणे येथील रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेथे डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून शस्त्रक्रियाही केली; परंतु परिवाराचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आणि बुधवारी रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली.
उमदा, हसतमुख व कष्टाळू तरुण हरपला:
किशोर सिंगन हे अत्यंत नम्र, हसतमुख, शांत आणि हरहुन्नरी स्वभावाचे तरुण होते. मित्रमंडळ आणि नातेवाईकांमध्ये ते अत्यंत लाडके आणि सर्वांचे परिचित होते. वृद्ध वडिलांना व्यवसाय तसेच शेतीकामात हातभार लावण्यात आणि संपूर्ण कुटुंबाला सांभाळण्यात त्यांचा खूप मोठा वाटा होता. कुटुंबाचा आणि व्यवसायाचा आधार असणारा तरुण मुलगा अचानक काळाने हिरावून नेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
अंतिम दर्शन व अंत्यसंस्कार:
किशोर सिंगन यांच्या पार्थिवावर आज गुरुवार, दि. २९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ठीक १० वाजता सिंगन परिवाराच्या चिंचोली फाटा (केज) येथील शेतात अंत्यसंस्कार पार पडणार आहेत.
शोकाकुल परिवाराच्या या असीम दुःखात केज शहर व परिसरातील नागरिक, सर्वपक्षीय पदाधिकारी, व्यापारी बांधव तसेच रोटरी क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. ईश्वर दिवंगत आत्म्यास अपने चरणी कायमचे स्थान देवो आणि सिंगन परिवारास हे वज्राघात सहन करण्याचे सामर्थ्य देवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
ओम शांती!



