Uncategorized

मालमत्तेचे ‘मूल्यांकन’ होणार ऑनलाइन; दुय्यम निबंधक कार्यालयातील चकरांपासून नागरिकांची सुटका

पुणे: मालमत्ता खरेदी-विक्री करणाऱ्या नागरिकांसाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने एक अत्यंत दिलासादायक निर्णय घेतला आहे. आता जमीन किंवा घराचे मूल्य निर्धारण म्हणजेच मूल्यांकन करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना मूल्यांकनासाठी नोंदणी कार्यालयात फेऱ्या मारण्याची गरज उरणार नाही.
नवीन ऑनलाइन सुविधेमुळे नागरिकांना घरबसल्या अवघ्या २४ तासांत मालमत्तेचे मूल्यांकन मिळणार आहे. यासाठी नागरिकांना केवळ जागेचे क्षेत्रफळ आणि सर्व्हे क्रमांक ऑनलाइन पोर्टलवर टाकून शुल्क भरावे लागेल. हे शुल्क भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी दुय्यम निबंधकांच्या डिजिटल स्वाक्षरीसह मूल्यांकन पत्रक उपलब्ध होईल, जे सर्व कायदेशीर कामांसाठी ग्राह्य धरले जाईल.
जुनी पद्धत बंद होऊन वेळ वाचणार
यापूर्वी मूल्यांकनासाठी नागरिकांना जागेची कागदपत्रे घेऊन प्रत्यक्ष कार्यालयात जावे लागत होते. तिथे ‘ग्रास’ प्रणालीद्वारे पैसे भरून, पावती जमा केल्यानंतर अधिकारी पडताळणी करायचे आणि मग शिक्का मारून मूल्यांकन दिले जायचे. या संपूर्ण कामासाठी किमान ३ ते ४ दिवस लागायचे. मात्र, आता ही नवीन पद्धत लागू झाल्याने ३-४ दिवसांचे काम एका दिवसात होणार आहे. तसेच कार्यालयात प्रत्यक्ष जाण्याची आणि रांगेत उभे राहण्याची गरज पडणार नाही. मानवी हस्तक्षेप कमी झाल्यामुळे या प्रक्रियेत मोठी पारदर्शकता येणार असून भ्रष्टाचाराला आळा बसेल.
पुण्याचे नोंदणी उपमहानिरीक्षक अभयसिंह मोहिते यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही प्रक्रिया सध्या प्रायोगिक तत्त्वावर सुरू असून येत्या महिनाभरात ती संपूर्ण महाराष्ट्र राज्यात लागू केली जाणार आहे. यामुळे सर्वसामान्यांचा वेळ आणि श्रम दोन्ही वाचणार आहेत. नागरिकांना अधिक माहितीसाठी ‘igrmaharashtra.gov.in’ या संकेतस्थळावर किंवा ‘8888007777’ या सारथी हेल्पलाइनवर संपर्क साधता येईल

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button