भाजप चे प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण मा.विलासराव देशमुख वरची टिका लातुरच्या जनतेच्या जिव्हारी
स्वर्गीय विलासराव देशमुखाचे कार्य झाकता येणार नाही
लातुर :- महाराष्ट्रात सह्याद्री एवढी राजकीय उंची असणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री महाराष्ट्राचे भाग्यविधाते स्व. विलासराव देशमुख यांना विसरणे कदापि शक्य नाही ज्यांनी लातूर जिल्ह्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी काय केले मराठवाड्यासाठी काय केले सांगण्याची गरज नाही मात्र
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी लातूर शहरांमध्ये जाऊन स्व विलासराव देशमुख साहेबा बाबत जे वक्तव्य केलं त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो
साहेबांनी काय केलं याबाबत आम्ही आपणांसमोर साहेबांच्या कार्याविषयी थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करत आहोत
ज्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष असलेल्या आमदार रवींद्र चव्हाण सारख्या व्यक्तीने आपण कुणाबद्दल काय बोललो ही चूक त्यांच्या लक्षात येईल
त्यांनी विलासराव देशमुख साहेबांचा इतिहास अगोदर जाणून घ्यायला हवा होता तेव्हा त्यांना स्व विलासराव देशमुख साहेबांच कार्य किती मोठ आहे हे मान्य करता आले असत
मात्र
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष लायकी पेक्षा जास्त बोललेले आहेत
लातूर जिल्ह्यामध्ये आजही अशी अनेक कुटुंबे आहेत ज्यांनी विलासराव देशमुख साहेबांचा फोटो देव्हाऱ्याप्रमाणे आपल्या घरात जपून ठेवला आहे त्यांना कदाचित हा इतिहास माहीत नसावा म्हणून त्यांचे बरडलेले वाक्य त्यांनी परत घ्यावे.
मराठवाड्यासाठी साहेबांनी काय केले याबाबत लिहिलेला हा लेख
पूर्वीचा उस्मानाबद असलेला आजचा धाराशिव जिल्ह्याचे विभाजन करून लातूर जिल्ह्याची निर्मिती करावी, अशी मागणी १९७० पासून सुरू झाली होती. बॅ. अ. र. अंतुले मुख्यमंत्रीपदी असताना होत होती
मुख्यमंत्रीपदी अंतुले विराजमान झाल्यानंतर त्यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते, या सत्काराला उतर देताना त्यांनी जे तुमच्या मनात तेच माझ्या ओठात असे सांगत तुम्हाला काय पाहिजे, असे उपस्थितांना विचारले, त्यावर जिल्ह्याची मागणी लोकांनी केल्यानंतर अंतुले म्हणाले, मान्य.. तुम्हाला जिल्हा दिला अशी ग्वाही दिली…आणि त्यानंतर अधिकृत शासनमान्यता घेत आश्वासनाची पूर्तताही केली.
निझामाच्या राजवटीतून मराठवाडा मुक्त झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड, बीड, धाराशिव हे पाच जिल्हे होते. या जिल्ह्यांचा भौगोलिक विस्तार पाहता जालना, लातूर, हिंगोली जिल्ह्यांची मागणी करीत होते. त्यात प्रथम बाजी मारली ती लातूरने. लातूरसाठी तीव्र आंदोलने होत असल्यामुळे शिवराज पाटील चाकूरकर, डॉ. शिवाजीराव निलंगेकर, विलासराव देशमुख ही दिग्गज मंडळी मुख्यमंत्री अंतुलेंना भेटू लागली. वास्तविक तेव्हाच्या मंत्रिमंडळात विलासराव देशमुख साहेबांचा समावेश करण्यात आला नव्हता. तरी लातूर जिल्ह्यासाठी ते आग्रही राहिले.
अंतुले यांनी जिल्ह्याची घोषणा केली तरी जानेवारी १९८२ मध्ये त्यांना पदावरून जावे लागले. पुढे बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री झाल्यानंतर १६ आॕगस्ट १९८२ ला जिल्ह्याचे अधिकृत उद्घाटन झाले. तत्कालिन पाटबांधारे मंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर, वनमंत्री दिनकरराव चव्हाण, आणि शिक्षण, राजशिष्टाचार मंत्री विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत लातूर जिल्ह्याचे उद्घाटन झाले. (भोसले यांनी विलासरावांना राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात घेतले होते.) एस. एस. हुसेन यांनी १६ तारखेला जिल्हाधिकारीपदाची सूत्रे स्वीकारली. ३ जून,१९८५ पर्यंत हुसेन या पदावर होते, अशी माहिती लातूर जिल्ह्याच्या संकेतस्थळावर मिळते. जिल्हा निर्मितीला चाळीस वर्षाहून अधिक काळ लोटला असून शिक्षण, उद्योग, शेती, सहकार आदी क्षेत्रात लातूरचे लक्षवेधी स्थान आहे.
अंतुलेंच्या डोळ्यात पाणी आले
जिल्हानिर्मितीसाठी शिष्टमंडळ मुंबईत अंतुले यांना भेटले. भेट झाल्यानंतर शिष्टमंडळ हिरवळीवर बसले होते. तेव्हा निलंगेकरांनी प्रतिज्ञा केली की लातूर जिल्हा झाल्याशिवाय मी लातुरात पाय ठेवणार नाही. ऐनकेन प्रकारे सरकारवर स्वपक्षियांनीच दबाव वाढविला होता.
लातूर जिल्ह्याचा रौप्यमहोत्सव साजरा करण्याचे ठरल्यानंतर मुख्यमंत्रीपदी विलासराव देशमुख होते. त्यांनी या सोहळ्याला जाणीवपूर्वक बॅ. अंतुले यांना बोलाविले.
अंतुले मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात विलासरावांना मंत्रिपद नव्हतं, असे असताना विलासरावांनी अंतुलेचा लातूरमध्ये सत्कार करायचे ठरविले. त्यावेळी भाषणात अंतुले यांनी विलासरावांची आठवण सांगितली. साहेब लातूरला मंत्रिपद नाही..पण आम्हाला लातूर जिल्हा तर द्या..मी म्हणालो ’दिला’..!! आणि लातूर जिल्हा निर्माण झाला, अंतुले साहेबाना बोलविण्याचे ठरविले… अंतुले भाषणात म्हणाले, विलासराव एक जिल्हा निर्माण करणं हे काही मोठं काम नाही, मी तुम्हाला मंत्री केलं नसताना, फक्त लातूर जिल्हा निर्माण केला म्हणून मला आज बोलवले, माझा सत्कार केला, विलासराव राजकारणात २५ दिवस कोणी लक्षात ठेवत नाही, तुम्ही २५ वर्ष मला विसरला नाहीत हो…आणि अंतुले साहेबांच्या डोळ्यात पाणी आले, यावेळी विलासराव देशमुख साहेब आणि अख्खी सभा हळहळली.



