केज :-दिनांक २१.०१.२०२६ रोजी अंबाजोगाई येथील कार्यालयात फिर्यादी डि.डि. चौरे तपासी आधिकारी हजर असतांना खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, कळंब अंबाजोगाई रोडवर युसुफ वडगाव शिवारात वाहतुक करतांना ता. केज जि. बीड येथे दोन इसम अवैध मद्याची वाहतुक करीत आहेत अशी बातमी समजल्यावर निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भ.प.क्रं. ०२ यांचे स्टाफ सह रात्री १९.००वा. खाजगी वाहनाने निघाले. त्यांच्या पथकाने चार चाकी गाडीचा पाठलाग करुन खालील मुद्येमाल जप्त केला. मारोती सुझुकी कंपनीची स्विफ्ट MH १४ EP ३७४१ चारचाकी वाहन, ५२८x१८० मिलीच्या बनावट रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या सिलबंद बाटल्या, २१००x९० मिलीच्या बनावट देशी दारु टँगो पंचच्या सिलबंद बाटल्या, १ सॅमसंग कंपनीचा A १४ मोबाईल, १ सॅमसंग कंपनीचा झेड फ्लीप ६ मोबाईल, अॅपल कंपनीचा आयफोन १३ मोबाईल असा एकुण रु. ७३६०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी इसम नामे १) रेवण सोपान नखाते, वय : ३५ वर्षे, रा. मठगल्ली, धारुर ता. धारुर जि. बीड २) गणेश मारोती धुमाळ, वय : ३५ वर्षे, रा. उपळाई रोड बार्शी ता. बार्शी जि. सोलापूर यांना अटक करण्यात आली.. तसेच त्यास दि. २२.०१.२०२६ रोजी प्रथमवर्ग न्यायालय केज जि. बीड येथे हजर करण्यात येत आहे. मुंबई दारुबंदी कायदा १९४९ चे सुधारित २०१८ चे कलम ६५ अ, ई, ८०,८१,८३,९०,१०३ कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. वरील नमुद मुद्देमाल दोन पंचासमक्ष जागीच पंचनामा करुन जप्त करुन ताब्यात घेतला. जप्त मुद्देमालातून रासायनिक पृथःकरणाकरिता मिळुन आलेल्या ९० मिली क्षमतेचे बनावट देशी दारु टँगो पंचची ०२ सिलबंद बाटल्या, १८० मिली क्षमतेच्या बनावट रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या सिलबंद बाटल्या यांचे नमुना दखल घेऊन नमुना सॅम्पलवर दोन पंचाच्या व मे. साहेबांच्या सह्यांची कागदी लेबले योग्य ती माहिती भरुन ती दोऱ्याने घट्ट बांधुन त्यावर लाख ओतून सरकारी पितळी सिलने जागीच सिलबंद केले. त्यानंतर कागदी लेबले नमुना बाटलीच्या दर्शनी भागास चिकटविली. नंतर नमुना बाटली व जप्त मुद्देमाल पुढील कार्यवाहीसाठी ताब्यात घेतला.
त्यानंतर सदर आरोपीस वैद्यकीय अधिकारी, स्वा.रा.ती.ग्रा.शा.वै.म. व रुग्णालय अंबाजोगाई येथे वैद्यकीय तपासणीसाठी नेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर आरोपीस जेवण देण्यात आले. व त्यांना एक्साईज कोठडीमध्ये ठेवण्यात आले. आज दि. २२.०१.२०२६ रोजी मा. न्यायालय केज येथे हजर करीत आहोत.
क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल
आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा
जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका
जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल