सामाजिक

मनोज जरांगेच्या शांतता रॅलीला आजपासून सुरवात; असा असणार रॅलीचा मार्ग

गेल्या कित्येक दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. या आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप झालेले पाहायला मिळाले आहेत. अशातच आता पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आला आहे. मराठा आंदोलकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण शांतता रॅलीला आज हिंगोलीतून सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

जरांगेंच्या शांतता रॅलीला आजपासून सुरूवात :
मनोज जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे ते 13 तारखेनंतर भूमिका स्पष्ट करणार असल्याचं मनोज जरांगेंनी सांगितलं आहे. तसेच या दरम्यान, हिंगोलीमध्ये मनोज जरांगेंच्या स्वागताची देखील जय्यत तयारी करण्यात आली आहे. जरांगेंच्या या शांतता रॅलीला आज सुरूवात होणार आहे.

मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅली काढणार आहेत. जरांगे पाटील हे शनिवारी 6 जुलै ते 13 जुलैपर्यंत ही जनजागृती रॅली आणि शांतता रॅली काढणार आहेत. ही रॅली राज्यभरात टप्प्याटप्याने घेतली जाणार असल्याचे समोर आले आहे.

कसा असणार मनोज जरांगेंच्या रॅलीचा मार्ग

 

आजपासून मनोज जरांगेंच्या शांतता जनजागृती रॅलीची सुरुवात होणार आहे. त्यामुळे या रॅलीला सुरवात आज हिंगोलीपासून सुरु होणार आहे. यावेळी मोठ्या प्रमाणावर मराठा समाज कार्यकर्ते या रॅलीत सहभागी होणार आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे विधानसभेत 288 उमेदवार उभे करायचे की 288 उमेदवार पाडायचे? हे मात्र 13 तारखेनंतर ठरवणार असल्याचं मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी सांगितलं आहे.

सुरवात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा – पुढे पोस्ट ऑफिस रोड – त्यानंतर आखरे मेडिकल – नंतर खुराना पेट्रोल पंप चौक महात्मा गांधी चौक – पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा (बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करणार) – यानंतर महात्मा गांधीजींचा पुतळा (महात्मा गांधीजींना अभिवादन करणार) – पुढे इंदिरा गांधी चौक इंदिरा गांधी चौकामध्ये जरांगे यांचं समारोपीय भाषण होणार आहे

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button