क्राईम

गौण खनिजाची चोरी करणार्या दोन जे.सि.बी. जप्त पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांची धडक कार्यवाही

सदर जे.सि.बी.चे कागदपत्र नसल्याचा अहवाल आर.टि.ओ कडून सादर

 

केज:- नांदुरघाट येथील  तलावामध्ये संशयीतरित्या उत्खनन करणाऱ्या दोन जेसीबी पोलिसांनी केल्या जप्त

दिनांक.२७/०१/२०२५ रोजीनांदुर घाट परिसरातील तलावामध्ये दोन जे.सी.बी.अवैधरित्या उत्खनन करीत असले बाबत माहिती पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांना मिळाली असता यांनी सदर घटनेची खात्री कारणे कमी पोलीस उपनिरीक्षक बनसोडे व पोलीस अंमलदार वाघमारे , भांगे यांना सदर ठिकाणी पाठवून सदर घटनेची खात्री केली असता नांदूरघाट परिसरातील पाझर तलावामध्ये दोन जे.सी.बी अवैधरित्या उत्खनन करत असताना मिळून आल्या सदर ठिकाणी त्यांच्याकडे कागदपत्राची मागणी केली असता कुठल्याही प्रकारचे उत्खनना संदर्भात तसेच जेसीबी संदर्भात वैध कागदपत्र सादर केले नाहीत व सदर ठिकाणाहून पळून जाण्याचा प्रयत्न केला.

तरी पुढील कारवाई कामी दोन्ही जे.सी.बी पोलीस स्टेशन येथे जप्त करण्यात आल्या आहेत. दोन्ही जेसीबीची अंदाजे किंमत ३० लाख आहे. सदर जे सी.बी.वर मा. कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार केज यांना कळवले आहे  व आर.टी.ओ. यांच्या कार्यालयात कारवाईसाठी अहवाल सादर करण्यात आला आहे.या अनुषगांने पोलीसच्या मागणी वरुन अंबाजोगाई येथील आ.टि.ओ यांनी सदर जे.सि.बी.चे कागदपत्र आपल्या कार्यालय नसल्याचे नमुद करुन पोलीस स्टेशन केज यांना कळवले आहे

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button