
केज:-आजच्या घडीला जर कोणी संकटात आसेल तर शेतकरी नापीक जमिन महागाई त्यावर जि एसटी चा भडिमार बि बियाणे महागाई नागरणी पेरणी पिक हातशी आले अतिवृष्टी दुष्काळ मजुरीचे भाव गगणाला पन मालाला हमी भाव नाही आसला तरी व्यापारी देत नाही धान्य वजन मापावर ठेवे पर्यत भावाची हमी नाही सरकारचे धोरण घोषणा करायची पन हाती काहीच द्यायचे नाही जिथे हमी तेथे सगळेच कमी असे सरकारचे धोरण अश्या संकटात होरपळलेला शेतकरी आर्थीक बाबतीत बाहेर पडेना गेलाय मग शेतकर्याना आत्महत्या शिवाय पर्याय दिसेना पन यावर सर्व शेतकरी बांधवानी कमीत कमी ५ वर्ष शेती मधले धान्य विक्री साठी पिकवायचे नाही फक्त शेतकर्यानी एकमेकाना उसनवारी करुनच धान्य द्यावे मग शेतकर्याना गोचडा सारखे रक्त पिणारे लोकांचे हाल झाल्याशिवाय शेतकर्यांची किंमत कळणार नाही
यांची खैर नाही
१) पैसे बुडवुन पळुन जाणारे मजुर तवली मारणारे हमाल
२)कृषी दुकाने
३)पेरणी करणारे टॅक्टर
४)पोळा सणात लुटणारे लोखंडी दुकानदार
५)धान्य खरेदीत काटा मारणारे व्यापारी व त्यांना पाठीशी घालणार्या कृषी उपन्न बाजार समित्या खरेदी विक्री संघातले दलाल
६)द्राक्षे, डांळिब, फळबाग, शेतकर्याना फसवणारे बागवान
७) पिकविमा भरण्यासाठी शेतकर्याना लुटणारे तहसिल मधले दलाल
८)उसात काटा मारणारे साखर कारखानदार
९)गायगोटा घरकुल या योजना देण्यासाठी लुटणारे दलाल ग्रामसेवक सरपंच व पंचायत समिती मधले भ्रष्ट आधिकारी
१०)जमिन खरेदी विक्री मधे लुटणारे दलाल
हे सर्व लोक शेतकरी बांधवाच्या काडीच्या हिताच्या नाहीत हे वरील लोकांनी फक्त शेतकर्याना लुटण्यासाठीच जन्म घेतला की काय अशी शंका येते
या वर सर्व शेतकरी बांधवानी एकत्र येऊन पिक पिकवण्यावर पाच वर्ष बहिष्कार घातला पाहीजे सगळे शेत पडिक फक्त गाय म्हैस अन खाण्यापुरती ज्वारी भाकरी दुध मिरची ठेचा भाजीपाला खाण्यापुरता फक्त उसनवारी शेतकरीना एकमेकाना करायची मग बघा या लुटणार्या टोळीची त्रेधा तिरपिट कशी उडेल ते पन तुम्ही संघटीत होत नाही तो पर्यत तुम्हाला हे जगु देणार नाहीत त्रिवार सत्य मग तुम्ही एकत्र आला नाहीत तर आत्महत्या शिवाय पर्याय नाही
या लुटणार्या टोळीचे एकच
महान वाक्य
भावपुर्ण श्रद्धांजली



