क्राईम

कला केंद्राच्या नावाखाली वेश्या व्यवसाय तेजीत

तालुक्यातील अनेक लॉजचे मालक मालामाल

 

केज:- मांजरसुम्बा ते केज दरम्यान तीन कला केंद्र आहेत सध्या केज तालुक्यात अवैद्य धंद्याने उच्छाद मांडला आहे दारू मटका लॉजवरील वेश्या व्यवसाय आणी हे कला केंद्र लोकनाट्य कलेच्या नावाखाली सरळ वेश्याव्यवसाय करून घेतला जातो अल्पवयीन मुलीकडुन डान्स करून घेतला जातो बैठकीत शौकीन लाखो रुपयांची उधळपट्टी करतात या नादा पायी अनेक ग्राहकांचा संसार मोडला यात सर्व वयातील ग्राहक जातात त्यात तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर व्यसनात अडकला आहे यासाठी पैसा कमावण्यासाठी वाम मार्गाने पैसा कमवत आहेत तालुक्यातील तीन तरुणांनी मध्ये महाराष्ट बँकेतून ऑनलाइन पद्धतीने पन्नास लाख रुपयांची चोरी केली होती हा सर्व पैसा या कला केंद्रा मध्ये उडवल्याची माहिती पोलिसात गुन्हा दाखल झाल्या नंतर या तरुणांनी पोलिसांना दिली अटक झाल्या नंतर बँकेचा पैसा परत बँकेला करण्या साठी तिघांनापण शेती विकावी लागली होती , या कला केंद्राच्या व्यसना पायी अनेकांचा संसार मोडत आहे काहींचा मोडला आहे अनेक जण कर्जबाजारीपणा मुळे आत्महत्या करत आहे मध्यंतरी उपअधिक्षक कुमावत साहेबांनी  यांनी तिन्ही केंद्रावर छापा मारून यांचे लायसन्स रद्द केले होते मात्र मागील काही दिवसापासुन हे केंद्र परत सुरू झाली आहेत पोक्सोसारखे गुन्हे दाखल होऊन ही या केंद्रांना परवानगी कोणी व कशी दिली हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकाना पडत आहे राजकारणी व पोलीस प्रशासन या व्यवसाया कडे डोळेझाक करत आहेत चार लोकांचे हित सांभाळण्या पेक्षा अनेकांचे संसार कशे वाचतील या कडे पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची नागरिकांची मागणी आहे

कला केंद्र अन लॉज मालक हे राजकीय नेते समाजसेवक  म्हणून घेत आहेत पन हे सामान्य लग्न न झालेल्या युवकांची प्रचंड  लुट करत आहेत

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button