सामाजिक
केज पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांचे शांततेचे आवाहन
विशालगड(गजापुर ) प्रकरणी हिंदु मुस्लिम युवकाकडुन वादग्रस्त व्हिडीओज मुळे अशांतता होण्याचा धोका

केज :- सध्या सोशल मिडीयात विशालगड ( गजापूर) प्रकरणातील अतिरंजित व आक्षेपार्ह व्हिडिओज् काही युवक दोन्ही बाजूंनी प्रसारित करत आहेत. अशा व्हिडिओज् मधून हिंदू मुस्लिम समाजात अशांतता पसरण्याचा व जातीय तेढ निर्माण होण्याचा संभव आहे.
आपल्या पोलीस स्टेशन हद्दीत आणि बीड जिल्हा मध्ये कुणीही युवक या प्रकरणातील आक्षेपार्ह व्हिडिओज्, फोटोज् शेअर करणार नाहीत तसेच जातीय तणाव निर्माण करणारे संदेश सोशल मिडीयात प्रसारित करणार नाहीत याबद्दल खबरदारीचे संदेश स्थानिक पातळीवर सर्वांनी द्यावे जेणेकरून बीड जिल्हा मध्ये शांतता राहील तसेच जे कोणी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न जे करणार त्यावर निश्चित कारवाई होईल. कारण तांत्रिक बाबीमुळे सदर अशांतता कोणी पसरवली याबाबत सखोल तपास करून निष्पन्न होत असते.. त्यामुळे प्रत्येकाने आपली सामाजिक जबाबदारी ओळखून आपल्या प्रतिष्ठेला बाधा येणार नाही याची जाणीव ठेवून सर्वांनी काळजी घ्यावी…
काही असमाजिक तत्व समाजात शांतता राहू नये यासाठी समाजाला बाधक कृत्य करत असते त्यावर सर्व सामान्य नागरिकांनी लक्ष ठेवावे अशा बाधक कृत्य करणारे कोणीही असो त्याबाबत माहिती द्यावी जेणेकरून समाजात अशांतता ठेवणारे यांचे वर कारवाई करण्यासाठी सोयीस्कर होईल व सामाजिक सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी आपली मदत ही अमूल्य राहील याची जाणीव ठेवा… आपला बीड जिल्हा हे आपले कुटुंब आहे, आमच्या पोलीस कुटुंबाचे आपण सदस्य आहात आपल्या बीड जिल्ह्य़ा मध्ये शांतता राहावी आणि आपल्या मोहल्या मध्ये आपसामध्ये तान तनाव होऊ नये जेणेकरून सर्व नुकसान आणि हानी ही आपल्यालाच होणार आहे, याची जाणीव ठेवून प्रत्येक नागरिकांनी आपली जबाबदारी सामंजस्याने सांभाळावे हीच एक विनंती आहे.
सर्व नागरिक हे जागृत आहेत सुशिक्षित आहेत आणि सज्ञान आहेत अशी अपेक्षा ठेवतो कोणतीही अफवा किंवा कोणी अशांतता निर्माण केल्यास नक्कीच मला माहिती भेटेल अशी अपेक्षा ठेवतो आणि त्याच्याविरुद्ध आपण माहिती दिली तर ते कोणी असो त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल परंतु आपण कोणतेही आतताई कृत्य करून कायदा हातात घेऊ नये व पोलिसांना मदत करावी जेणेकरून कोणतेही अनुचित घटना घडणार नाही. असे आपणास पोलिस स्टेशन केजच्या वतीने आवाहन करण्यात येते.
जय हिंद
सदैव आपल्या सेवेत
पोलिस निरीक्षक प्रशांत कमलाकर महाजन
पोलीस स्टेशन केज



