क्राईम
लाचेच्या आरोपातुन साळेगावचे तलाठी आनिल कुलकर्णी यांची निर्दोष मुक्तता
निवृती ६ महिने वर आली आसताना लाचेमधे झाले होते चत्रभुज

केज :-सुकळी येथील रामरतन गिरी यांनी वारसाचा फेर मंजुर करण्यासाठी साळेगावचे तलाठी आनिल कुलकर्णी व त्यांचे राईटर तुळशीराम मुकदम यांच्याशी संपर्क केला आसता त्यांनी पैसेची मागणी केली आसता दिनांक १६/३/२०१६ रोजी बीड येथील लाचलुचपत कार्यालयाशी संपर्क केला व तलाठी व त्यांचे राईटर वारसाचा फेर मंजुर करण्यासाठी २२०० रुपये मागत आसल्याची तक्रार दाखल केली आसता लाच लुचपत प्रतिबंध खात्याकडुन सापळा टाकण्यात आला आसता दिनांक १७/३/२०१६रोजी संबधीत तलाठी व राईटर यांनी लाचेची रक्कम मागितली व ती स्विकारली बाबत केज पोलीस स्टेशन येथे लाच लुचपत कायद्याअंतर्गत गु, र, नं, ७३/१६ या नुसार कलम ७, ८, १२, १३, १३(२) अन्वये गुन्हा दाखल केला त्यानंतर जिल्हा सत्र न्यायालय अंबाजोगाई येथे सदरील आरोपी विरुद्ध दोषारोप पत्र दाखल करण्यात आले व २०२३ मधे पुढील सुनावणी साठी जिल्हा सत्र न्यायालय केज येथे सदरील प्रकरण वर्ग करण्यात आले आसता अभियोग पक्षाचे साक्षीदार तपासल्यानंतर दोन्ही बाजुचा युक्तीवाद एैकल्यानंतर दिनांक १८/७/२०२४ रोजी मा जिल्हा सत्र न्यायालयाचे प्रथम न्यायाधिश कुनाल जाधव साहेब यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली
विशेष म्हणजे एकही सरकारी साक्षीदार फितुर झाला नव्हता



