सामाजिक

कोयता घासुन बीडचे लाखो उसतोड कामगार पर राज्यात लढाईला नव्हे तर उसतोडीला दाखल

केज :- उसतोड कामगारांच्या जिवावर देश विदेशातील अनेक दौरे प्रचंड संपत्ती कमवुन मौजमजा करत आसलेल्या नेत्यांनी सांगितल्या प्रमाणे कोयता घासुन लढाई ला तयार व्हा असे आवाहन करणारे नेत्यांना प्रतिसाद देत एैन दिवाळीत बीड जिल्ह्यातील लाखो उसतोड कामगार पर राज्यात लढाईला नव्हे उसतोडीला जात आहेत हे नेतेमंडळींला शरम हया वाटली पाहिजे आपले आई बहिनीला हाताला रोजगार देऊन त्यांच्या हातातील कोयता कसा निघेल यासाठी प्रयत्न केले पाहिजे होता स्व:ताच्या राजकारणासाठी जातीय तेढ निर्माण करण्यासाठी कोयता घासण्याची भाषा करत आहेत यांची शरम वाटली पाहिजे आज केंद्रात आणि राज्यात एका विचारांचे सरकार आहे बीड जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात एम.आय. डी. सी. आणली पाहिजे आज बीड जिल्ह्यातील उद्योजक पुणे चाकण.राजगुरुनगर.रांजणगाव येथील एम.आय.डि.सी.मधे गुंतवणूक करुन इतर जिल्ह्यांतील तरुणांना रोजगार देऊन त्यांच्या पाठीशी उभे राहत आहेत कारण येथील नेतेमंडळी अंत्यंत मतलबी राजकारणासाठी गोरगरीब जनतेला जातीपातीच्या पलिकडे काहीही पदरात पडु देत नाही या बीड जिल्ह्यातील उद्योजकांना कोणतीही एम.आय.डी.सी उपलब्ध करुन देत नाहीत राजआश्रय दिला जात नाही बीड जिल्ह्यातच आरक्षणाची धग का या नेते मंडळींनी येथील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला नाही म्हणून त्यांना सरकारी नोकरी मिळेल या आशेने सरकारकडे ओशळलेल्या तोंडाने पाहत आसल्यामुळे बीड जिल्ह्यात आरक्षणाची धग प्रचंड प्रमाणात पसरत आहे जर वेळीच गोरगरीब तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आसता तर तुम्हालाही आरक्षण मिळण्यासाठी तरुणांना आत्महत्या करावी लागली नसती बीड जिल्ह्यातील नेतेमंडळी मुळे बाहेर जिल्ह्यातील नालायक लोकांनी राजकारणासाठी येथे येऊन वातावरण नासवलेले आहे याला पन बीडचीच नेतेमंडळी जवाबदारी आहे मग या जातीयवाद करुन मत मागणारे नेतेमंडळीनां आज जातीतले लोक पावसात भिजून थंडीत कुडकुडत परराज्यात उसतोडीला पहाटे तीन वाजल्यापासुन जात आहेत आता तरी सुधरा अन् कोयता घासण्याची भाषा करणारे नेतेमंडळी वर आता जनतेने विश्वास ठेऊ नये यांच्या कडे खात्रीचा रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी यांना झोडपून काढले पाहिजे मग तो कोणत्याही पक्षाचा असो

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button