Uncategorizedसामाजिक

केज बसस्थानकात पाणपोईचा शूभारंभ

उन्हाळ्यात प्रवास करणार्याना दिलासा

 

केज:- येथील माहेश्वरी प्रगती मंडळाच्या वतीने शुक्रवारी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बसस्थानकात शितल जल केंद्राचे ( पाणपोई ) उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे प्रवाशांची थंड पाण्याची सोय झाली आहे.
शहरातील माहेश्वरी प्रगती मंडळ सतत विविध सामाजिक उपक्रम राबवत असते. ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना पिण्यासाठी थंड पाणी मिळावे या हेतूने गेल्या वर्षीपासून मंडळाच्या वतीने बसस्थानकात पाणपोई सुरू करण्यात येते. मंडळाच्या वतीने शुक्रवारी पणपोईचे उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष धारूर आगाराचे प्रमुख नवनाथ चौरे तर उद्घाटक म्हणून माहेश्वरी प्रगती मंडळाचे बीड जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण तोष्णीवाल, जिल्हा उपाध्यक्ष ओम प्रकाश भुतडा व सचिव जगदीश जाजू, केजचे बस स्थानक प्रमुख शिंदे यांची उपस्थिती होती.
यावेळी जगदीश जाजू यांनी प्रास्ताविकात केज माहेश्वरी प्रगती मंडळाच्या माध्यमातून होत असलेल्या सामाजिक कार्याचा लेखाजोखा सादर केला. धारूर आगाराचे प्रमुख श्री. चौरे यांनी माहेश्वरी समाजाच्या वतीने होत असलेल्या कार्याचा गौरव करून प्रवाशांनी पाण्याचे महत्व लक्षात घेऊन पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आव्हान केले.
यावेळी माहेश्वरी समाज केज तालुका अध्यक्ष मनीश जाजू, सचिव सचिन भुतडा, कोषाध्यक्ष संतोष बियाणी, लक्ष्मीनारायण सोनी, रामेश्वर जाजू, रामेश्वर बियाणी, रमेशचंद्र बाहेती, चंद्रप्रकाश बियाणी, राहुल संकलेचा, संतोष रिणवा, जगदीश तापडिया, संदीप भुतडा, सुरेश सोनी, रामविलास सोनी, सतीश काकाणी, हरकुल स्वामी, महेश जाजू पत्रकार रामदास तपसे, डी डी बनसोडे यांच्यासह केज शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button