शैक्षणिक

विद्यार्थ्यानो स्वतः चा मार्ग स्वतः हा निवडा श्री .संजय चवरे सर

केंद्रप्रमुख श्री .संजय चवरे सर यांचे मनोगत

केज:- बीड जिल्हा ऊसतोड कामगार विकास मंडळ केज. संचालित,
साने गुरुजी निवासी विद्यालयात दिनांक १५/०५/२५ इयत्ता१० वी व १२ वी परीक्षमधून शाळेतून प्रथम, व्दितीय,तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचा व ९० टक्केपेक्षा जास्त गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या प्राचार्य कविता कराड मॅडम व प्रमुख पाहुणे केंद्रप्रमुख श्री.संजय चवरे सर होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री.संदीप मंजराने सर (ए.पी.आय केज ) केज पोलीस स्टेशन हे होते. तसेच वस्तीग्रह अधिक्षक श्री.चाटे.बी.पी सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना श्री.संजय चवरे सर म्हणाले कि दहा वर्षाच्या अथक प्रयत्ना नंतर आपण शिक्षणातला पहिला टप्पा पूर्ण केला आहे. पुढील शिक्षणासाठी योग्य दिशा ठरवणे गरजेचे आहे. स्वतः चा मार्ग स्वत निवडा. करण एकदा दिशा चुकली तर करियरचा प्रश्न उभा राहतो. तेव्हा अचूक दिशा निवडा फक्ता डॉक्टर इंजिनियर या कडे न जात अनेक विविध संधी उपलब्ध आहेत .सध्या बीड जिल्ह्यातून IAS साठी चार मुले पात्र ठरले आहेत. तेव्हा स्पर्धा परीक्षाचे क्षेत्र निवडले तर चांगले ठरते. जसा महाराष्ट्रत मुलींच्या निकालच टप्पा जास्त आहे. तसाच या विद्यालयात सुद्धा मुलींचा गुणवत्तेतील टक्का जास्त आहे. तरी त्यांच्या पालकांनी मुलीना त्यांच्या पायावर उभा करावे. लवकर लग्न न करता त्यांना संसारत अडकू नये आताच आपल्या समोर भारत पाकिस्तान युद्धातील कर्नल सोफिया कुरेशी, युमिका सिंग यांनी ऑपरेशन सिंदूर या युद्धाचे नेतृत्व केले म्हणजेच महिला सुधा कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत त्यांना संधी दिल्यास त्या संधीचे सोने करतात. विद्यार्थ्यांना बोलत असताना मित्र,नातेवाईक यांनी एखादे क्षेत्र निवडले म्हणून तुम्ही ते क्षेत्र निवडू नका आपल्या अंगी असणाऱ्या कौशल्यानं वाव द्या म्हणजे निश्चित तुम्ही यशस्वी व्हाल यापुढे सरकारी नोकऱ्या नाहीत त्यामुळे स्वताच्या करियरचा मार्ग स्वतः हा निवडा शाळेबद्दल बोलतांना उपक्रमशील शाळा, गुणवंत शाळा, विद्यार्थ्यानाच्या अंगी असलेल्या कौशाल्याना वाव देणारी शाळा असे गौरव उद्गार काढले. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री.संदीप मंजारणे साहेब म्हणाले कि विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांकडे वळावे स्पर्धा परीक्षातून PSI पासून ते वर्ग १ पर्यंत अनेक नोकऱ्या उपलब्ध आहेत. स्पर्धा परीक्षांचा मार्ग निवडल्यास योग्य राहील.विद्यार्थ्यांना भावी शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.तसेच चाटे बी.पी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी विद्यार्थ्यांचा पालकांसोबत प्रमुख अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.कविता कराड मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाच्या शिक्षिका श्रीम.कांदे मॅडम यांनी केले. आभार प्रदर्शन चोले सर यांनी केले सदरील कार्यक्रमास गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button