Uncategorizedआपला जिल्हा

बीड-मुंबई अन् बीड-पुणे थेट रेल्वेसाठी खासदार बजरंग बाप्पांचा तगडा पाठपुरावा; विकासकामांचा धडाका!

बीड-मुंबई, बीड-पुणे थेट ट्रेन; खासदार बजरंग बप्पा आक्रमक!

बीड:-“जे आजपर्यंत कोणत्याही खासदारांना जमले नाही, ते खासदार बजरंग बप्पा करून दाखविणार” असे चित्र सध्या बीड जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. जिल्ह्याच्या रेल्वेच्या प्रश्नासाठी खासदार बजरंग बप्पा सोनवणे हे अत्यंत गतीने आणि झपाटल्यासारखे काम करत आहेत.
आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयात राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. श्रीमती सुनेत्रा अजित पवार आणि खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत अहमदनगर–बीड–परळी या बहुप्रतिक्षित रेल्वे प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
बीड–पुणे आणि बीड–मुंबई थेट रेल्वेची ठाम मागणी
या आढावा बैठकीत खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांनी बीडकरांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर थेट बोट ठेवले. त्यांनी बीड–हडपसर (पुणे) आणि बीड–मुंबई या दोन महत्त्वाच्या मार्गांवर थेट रेल्वे सेवा तात्काळ सुरू करण्याची ठाम मागणी केली.
तसेच, “येत्या १७ सप्टेंबरपूर्वी बीडमध्ये रेल्वे धावलीच पाहिजे” असा आक्रमक पवित्रा घेत त्यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला. प्रकल्पातील उर्वरित सर्व कामे युद्धपातळीवर पूर्ण करून जमिनीचे प्रश्न, तांत्रिक अडचणी आणि प्रशासकीय प्रक्रिया तातडीने निकाली काढण्याचे निर्देश त्यांनी दिले. बीडकरांच्या अनेक वर्षांच्या रेल्वेच्या स्वप्नपूर्तीसाठी कोणतीही कसूर राहू नये, अशा सूचना संबंधित रेल्वे व प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
जिल्हा परिषद विकासकामे व क्रीडा क्षेत्राचा आढावा
रेल्वेच्या बैठकीनंतर खासदार बजरंग बाप्पा यांनी बीड जिल्हा परिषदेअंतर्गत चालणाऱ्या विविध विकासकामांचा आढावा घेतला. ग्रामीण भागातील प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागांना दिले.
त्यानंतर जिल्हा क्रीडा संकुल समिती व स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा आयोजन समितीच्या बैठकीत ते सहभागी झाले. या बैठकीत आगामी क्रीडा स्पर्धांचे नियोजन, जिल्ह्यातील क्रीडा सुविधांचा दर्जा वाढवणे आणि खेळाडूंना अधिक चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.
नगर परिषद आणि नागरी सुविधांवर चर्चा
दिवसभराच्या या दौऱ्यात बीड नगर परिषदेच्या संदर्भातही एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यामध्ये बीड शहरातील मूलभूत विकासकामे, पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि इतर नागरी समस्यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणींवर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

“बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास, दर्जेदार पायाभूत सुविधा आणि जनतेच्या प्रत्येक प्रश्नाचे निवारण करण्यासाठी माझा सातत्यपूर्ण पाठपुरावा असाच कायम राहील.”

– खासदार बजरंग बापपा सोनवणे

खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या या धडाकेबाज कार्यपद्धतीमुळे आणि विविध बैठकांच्या सत्रामुळे बीड जिल्ह्याच्या विकासाला मोठी गती मिळण्याची चिन्हे दिसत असून, १७ सप्टेंबरपूर्वी बीडमध्ये रेल्वेची शिट्टी वाजणार का, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button