Uncategorized

“घोटाळा करून सुटायची स्वप्ने भंगले! बीड कोर्टाने सनदी अधिकारी अविनाश पाठकचा माज उतरवला, जामीन नाकारला”

“खुर्ची गेली, आता लायकीही कळाली! बीड जिल्हा न्यायालयाचा दणका, भ्रष्टाचारी अधिकारी अविनाश पाठकचा खेळ खल्लास”

बीड :-भूसंपादन लवादाचा निवाडा जाहीर करण्याच्या प्रकरणातील आरोपी असलेले आणि पूर्वी बीड येथे माजी जिल्हाधिकारी (प्रभारी) राहिलेले सनदी अधिकारी अविनाश पाठक यांचा जामीन अर्ज बीडच्या जिल्हा न्यायालयाने फेटाळला आहे. प्रभारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. आर. शिंदे यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.
नेमके काय आहे प्रकरण?
शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या भूसंपादन घोटाळा प्रकरणात पोलिसांनी अविनाश पाठक यांना अटक केली होती. अटक झाल्यानंतर त्यांना सुरुवातीला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत (तुरुंगात) करण्यात आली. यानंतर पाठक यांनी जामिनासाठी बीड जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता.
मागील तारखेला न्यायालयाने तपास अधिकाऱ्यांकडे या प्रकरणातील नेमके लाभार्थी कोण आहेत, याची सविस्तर माहिती मागवली होती. शनिवार, ६ जून रोजी यावर न्यायालयात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाला. न्यायालयाने आरोपीच्या वतीने करण्यात आलेला युक्तिवाद फेटाळून लावला. अविनाश पाठक यांनी बीडमध्ये यापूर्वी विविध पदांवर काम केले असल्याने ते एक प्रभावी व्यक्ती आहेत, तसेच या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे, ही बाब लक्षात घेऊन न्यायालयाने त्यांचा जामीन नाकारला.
पोलिसांनी न्यायालयात काय सांगितले?
अर्जाच्या सुनावणीदरम्यान पोलिसांनी न्यायालयात महत्त्वाचे खुलासे केले:
आरोपी संजय हांगे आणि अविनाश पाठक यांच्यात झालेल्या टेलिफोन कॉलचा वारंवार संदर्भ देण्यात आला आहे.
ज्या प्रकरणात अगोदरच लवादाचे निर्णय झाले होते, त्या प्रकरणातील फाईलवर (संचिका) सही घेण्यासाठी आणखी एका संशयिताचा आणि संजय हांगे यांचा संपर्क व संभाषण झाले होते.
विशेष म्हणजे संशयित संजय हांगे आणि अविनाश पाठक यांचे ‘लोकेशन’ एकाच ठिकाणी एकत्र होते, असा दावा पोलिसांनी केला.
या प्रकरणात न्यायालयाने योगिनी जाधव आणि डॉ. सोमनाथ शिंदे यांचे जबाब महत्त्वाचे मानत आपले निरीक्षण नोंदवले आहे.
संचिका (फाईल) गहाळ प्रकरणातील दावाही फेटाळला
या प्रकरणातील काही संचिका गहाळ असून त्या अविनाश पाठक यांच्याच ताब्यात असल्याचा दावा पोलिसांनी केला होता. यावर समितीने संपूर्ण १५४ संचिकांचा तपास केला असून, कोणतीही संचिका गहाळ नसल्याचे पत्र पोलिसांनी दिले आहे, असा युक्तिवाद आरोपींच्या वतीने करण्यात आला.
मात्र, न्यायालयाने सर्व संचिका प्रत्यक्ष पाहिल्या नसून, समितीच्या वतीने केवळ संचिका गहाळ नसल्याचे पत्र आल्याचे नोंदवले. तसेच, आरोपीच्या वतीने ज्या संचिका बदलीपूर्वी मागवून कारवाई सुरू झाल्याचे सांगण्यात आले होते, त्या संचिका केवळ २० असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आणि पाठक यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button