Uncategorized
जनविकास आघाडीचे सर्वेसर्वा हारुण इनामदार यांच्या पाठपुराव्याला यश; जिरायत खात्याची जागा अखेर केज नगरपंचायतीच्या ताब्यात!
खासदार बजरंग बप्पा सोनवणे व माजी खासदार रजनीताई पाटील यांचे मोलाचे सहकार्य
दिवंगत नेते अजित दादा पवार, उपजिल्हाधिकारी वजाळे साहेब, दिवंगत तहसीलदार राकेश गिड्डे व तलाठी साहिल इनामदार यांचे मोलाचे सहकार्य;
केज :- केज शहरातील सार्वजनिक विकासकामांना गती देणारी एक अत्यंत महत्त्वपूर्ण घडामोड समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला मौजे केज येथील सर्व्हे नंबर १०४ मधील जिरायत खात्याचा शासकीय भूखंड अखेर अधिकृतपणे केज नगरपंचायत प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आला आहे. महसूल विभाग आणि नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने मंगळवार, दिनांक ४ जून २०२६ रोजी ही हस्तांतरण प्रक्रिया प्रत्यक्ष जागेवर जाऊन अत्यंत पारदर्शकपणे पूर्ण करण्यात आली.
नेत्यांचा ऐतिहासिक पाठपुरावा आणि राजकीय सहकार्य
हा भूखंड नगरपंचायतीला मिळावा यासाठी जनविकास आघाडीचे सर्वेसर्वा हारुणभाई इनामदार आणि नगराध्यक्ष सिताताई बनसोड यांनी सातत्याने शासन व प्रशासन स्तरावर वजनदार पाठपुरावा केला होता. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या जागेचा वापर लोकहितार्थ व्हावा, यासाठी या दोन्ही नेत्यांनी सर्व कायदेशीर आणि प्रशासकीय बाबींची पूर्तता करून घेतली.
या महत्त्वपूर्ण कामात केजच्या विकासासाठी नेहमीच तत्पर असणाऱ्या माजी खासदार रजनीताई पाटील आणि विद्यमान लोकप्रिय खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांचे व अप्रत्यक्ष नेतेमंडळी चे मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले. खासदारांच्या विशेष प्रयत्नांमुळे आणि वजनामुळे महसूल विभागाकडून या जागेच्या हस्तांतरणाचे आदेश तातडीने निघण्यास मोठी मदत झाली, अशी चर्चा आता संपूर्ण केज शहरात सुरू आहे.
दिवंगत नेते अजितदादा पवार व उपजिल्हाधिकारी वजाळे साहेब यांचे विशेष सहकार्य
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी आणि शासकीय जागा हस्तांतरणाच्या प्रक्रियेसाठी राज्याचे दिवंगत नेतृत्व ना. अजितदादा पवार यांचे अत्यंत मोलाचे सहकार्य व खंबीर मार्गदर्शन लाभले. तसेच उपजिल्हाधिकारी वजाळे साहेब यांनी शासकीय पातळीवरील अनेक तांत्रिक व प्रशासकीय अडचणी दूर करण्यासाठी विशेष लक्ष देऊन मोलाचे सहकार्य केले. या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल केज नगरपंचायतीच्या वतीने ना. अजितदादा पवार आणि उपजिल्हाधिकारी वजाळे साहेब यांचे जाहीर आभार मानण्यात आले आहेत.
दिवंगत तहसीलदार राकेश गिड्डे व तलाठी साहिल इनामदार यांचे योगदान
ही जागा केज नगरपंचायतीला हस्तांतरित होण्याच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये दिवंगत तहसीलदार राकेश गिड्डे साहेब यांचे योगदान अत्यंत मोलाचे राहिले आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात या प्रकरणातील सर्व कायदेशीर अडचणी दूर करून प्रशासकीय प्रक्रियेला गती दिली होती, ज्याची आज या प्रसंगी कृतज्ञतेने आठवण काढण्यात आली. तसेच तलाठी साहिल इनामदार यांनी जागेची मोजणी, कागदपत्रांची अचूक पडताळणी आणि ताबा पावती तयार करण्यापासून ते प्रत्यक्ष हस्तांतरणापर्यंत अहोरात्र कष्ट घेऊन अतिशय मोलाचे सहकार्य केले. या दोन्ही महसूल अधिकाऱ्यांच्या सकारात्मक भूमिकेमुळेच हा गुंता सुटू शकला.
तहसीलदारांच्या आदेशान्वये शासकीय कारवाई
मा. तहसीलदार साहेब, केज यांच्या कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या आदेशान्वये (आदेश क्रमांक: २०२५/जमाबंदी/कावि, दिनांक १२/०१/२०२५) ही कारवाई करण्यात आली. केजचे मँडळ अधिकारी श्री. भालेराव एन. जे. यांनी अधिकृतपणे जागेचा ताबा केज नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्री. अजित ढोपे यांच्याकडे सुपूर्द केला.
हस्तांतरित जागेचा सविस्तर तपशील आणि चतुःसीमा
नगरपंचायतीच्या ताब्यात आलेल्या या मौल्यवान जागेची माहिती खालीलप्रमाणे आहे:
गाव व तालुका: मौजे केज, जिल्हा बीड.
सर्व्हे नंबर: १०४ मधील पोट हिस्सा नंबर ०६.
चतुःसीमा (जागेच्या चारही बाजू):
पूर्वेस: सर्व्हे नंबर ०५ ची जमीन.
पश्चिमेस: कानडीमाळी रस्ता.
दक्षिणेस: बीड – अंबाजोगाई मुख्य रस्ता.
उत्तरेस: सर्व्हे नंबर १०४ व पोट हिस्सा नंबर ०६ मधील शिल्लक शासकीय जमीन.
अधिकारी व प्रमुख पंचांच्या उपस्थितीत पंचनामा
४ जून रोजी प्रत्यक्ष जागेवर जाऊन रीतसर पंचनामा करण्यात आला. या ऐतिहासिक कायदेशीर प्रक्रियेच्या वेळी शहरातील प्रमुख नागरिक आणि लोकप्रतिनिधी पंच म्हणून उपस्थित होते.
उपस्थित पंच:
१) इनामदार जकियाोद्दीन महेबुबमियाँ (गट नेते, नगरपंचायत)
२) जलाल मुनुमियाँ इनामदार
३) मसके मनोज ज्ञानोबा
४) मुफसिल एकबाल शेख
५) तात्या गवळी
शहराच्या विकासाला मिळणार नवी दिशा
मंडळ अधिकारी श्री. भालेराव यांनी ताबा पावती, पंचनामा, ७/१२ फेरफार नकल यांसह सविस्तर अहवाल मा. तहसीलदार कार्यालय, केज यांच्याकडे सादर केला आहे.
नागरिकांमधून आनंदोत्सव:
हारुणभाई इनामदार, नगराध्यक्ष सिताताई बनसोड यांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि ना. अजितदादा पवार, खासदार बजरंग बप्पा सोनवणे व रजनीताई पाटील यांच्या पाठबळामुळे, तसेच उपजिल्हाधिकारी वजाळे साहेब, दिवंगत तहसीलदार राकेश गिड्डे साहेब व तलाठी साहिल इनामदार यांच्या प्रशासकीय सहकार्यामुळे केज नगरपंचायतीला हक्काची जागा मिळाली आहे. या जागेवर आता भव्य सार्वजनिक प्रकल्प, प्रशासकीय इमारत किंवा नागरिकांसाठी उपयुक्त सुविधा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असून, केजवासीयांनी या सर्व नेत्यांचे आणि महसूल प्रशासनाचे जाहीर आभार मानले आहेत.
विशेष म्हणजे गुगली (काडी) करुन दिवस काढणारे यामधे कुठेही काडीचे योगदान नाही दिसेल त्यांना काडी करण्यातच धन्यता मानतात



