Uncategorized
केजमध्ये डिझेलचा कृत्रिम तुटवडा; पेट्रोल पंप चालकांची मनमानी, सर्वसामान्य जनता वेठीस! प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी शुभम पवार साहेब ‘साठेबाजांना’ धडा शिकवणार का? जनतेचे लक्ष
केजमध्ये डिझेलसाठी शेतकरी ताटकळत, प्रशासनाचा निष्काळजीपणा समोर!
केज :-केज तालुक्यात सध्या डिझेल आणि पेट्रोलचा प्रचंड तुटवडा भासत असून, हा तुटवडा नैसर्गिक नसून कृत्रिम असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. पेट्रोल पंप चालक सर्वसामान्यांना इंधन नाकारत असताना, ठराविक ‘बोर’ घेणाऱ्या गाड्यांना मात्र छुप्या पद्धतीने डिझेलची विक्री केली जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. यामुळे केजमधील पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा लागल्या असून जनतेचे प्रचंड हाल होत आहेत.
नेमका प्रकार काय?
गेल्या काही दिवसांपासून केज शहरातील आणि परिसरातील पेट्रोल पंपांवर ‘नो स्टॉक’चे फलक पाहायला मिळत आहेत. मात्र, दुसरीकडे आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी पेट्रोल पंप मालक बोरवेल गाड्यांना आणि ठराविक मोठ्या वाहनांना डिझेलचा पुरवठा करत आहेत. शेतीकामासाठी आणि अत्यावश्यक प्रवासासाठी डिझेल मागायला गेलेल्या सामान्य नागरिकांना तासन्तास रांगेत उभे राहूनही रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.
नूतन उपजिल्हाधिकाऱ्यांसमोर पहिले आव्हान
नुकतेच केज तहसिल कार्यालयमध्ये प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी म्हणून शुभम पवार साहेब यांनी पदभार स्वीकारला आहे. एकीकडे सामान्य जनता इंधनासाठी वणवण फिरत असताना, दुसरीकडे साठेबाजी आणि काळाबाजार जोरात सुरू आहे. अशा परिस्थितीत, पवार साहेब या साठेबाजांच्या मुसक्या आवळणार की या प्रकाराकडे दुर्लक्ष करणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
“आम्ही तासनतास रांगेत उभे आहोत, पण पंप काही मालक साठा संपल्याचे सांगत आहेत. तर काही पेट्रोल पंप धारक आलेले डिझेल पेट्रोल संपेपर्यंत देत आहेत काही रात्रीच्या वेळी ठराविक गाड्यांना डिझेल दिले जाते. प्रशासनाने यावर तात्काळ कारवाई करावी.”
— एक संतप्त नागरिक, केज



