Uncategorized

“केज खरेदी केंद्रावर नेत्यांची ‘चंगळ’, बळीराजाच्या नशिबी मात्र ‘हळहळ’!”

केज खरेदी-विक्री संघात शेतकऱ्यांची अडवणूक; नेत्यांचे लाड अन् बळीराजाच्या नशिबी ताटकळणे!

केज:-शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा यासाठी शासनामार्फत सुरू करण्यात आलेली खरेदी केंद्रे सध्या शेतकऱ्यांऐवजी राजकीय नेत्यांच्या सोयीची ठरत असल्याचे चित्र केजमध्ये पाहायला मिळत आहे. केज खरेदी-विक्री संघाच्या हरभरा खरेदी केंद्रावर सर्वसामान्य शेतकऱ्यांचा हरभरा नाकारला जात असून, बड्या नेत्यांच्या शेकडो क्विंटल मालासाठी पायघड्या घातल्या जात असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.
नेत्यांच्या हरभऱ्याने ‘बारदाना’ फस्त
मिळालेल्या माहितीनुसार, या खरेदी केंद्रावर गेल्या काही दिवसांपासून मोठ्या नेत्यांनी आपल्या नातेवाईकांच्या आणि पाहुण्यारावळ्यांच्या नावाखाली शेकडो क्विंटल हरभरा विक्रीसाठी आणला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, शासनाकडून प्राप्त झालेला संपूर्ण बारदाना या राजकीय मंडळींच्या मालासाठीच वापरून संपवण्यात आला आहे. परिणामी, आता केंद्रावर बारदाना उपलब्ध नसल्याचे कारण सांगून सर्वसामान्य शेतकऱ्यांना परत पाठवले जात आहे.
शेतकरी विनोद गुंड यांची व्यथा
या अन्यायाचा फटका बसलेले केजमधील शेतकरी विनोद गुंड यांनी आपली कैफियत मांडली आहे. त्यांना प्रशासनाकडून १८ तारखेला हरभरा आणण्यासाठी बोलावण्यात आले होते. नियमाप्रमाणे आपला माल विकला जाईल या आशेने ते केंद्रावर पोहोचले, मात्र तेथे गेल्यानंतर “बारदाना संपला आहे” असे सांगून त्यांचा माल घेण्यास नकार देण्यात आला.

“आम्हाला तारखा देऊन बोलावले जाते, पण तिथे गेल्यावर कळते की नेत्यांच्या मालामुळे बारदाना संपला आहे. मग हे केंद्र आमच्यासाठी आहे की राजकीय नेत्यांच्या तडजोडीसाठी?” असा संतप्त सवाल विनोद गुंड यांनी उपस्थित केला आहे

राजकीय तडजोडीचे केंद्र?

शेतकऱ्यांमध्ये आता अशी चर्चा सुरू आहे की, हे खरेदी केंद्र खरोखरच बळीराजासाठी आहे की नेत्यांचे खिसे भरण्यासाठी? अनेक नेत्यांनी स्वतःच्या सातबाऱ्यावर मर्यादा ओलांडून किंवा इतरांच्या नावाखाली माल घातल्याच्या तक्रारी होत आहेत. ज्या शेतकऱ्यांनी वेळेवर नोंदणी केली, त्यांना ताटकळत ठेवले जात असून वजनकाट्यापासून ते बारदाना उपलब्धतेपर्यंत सर्वत्र वशिला लावला जात असल्याचे दिसत आहे.
प्रशासनाकडून उत्तराची प्रतीक्षा:
या सर्व प्रकारामुळे संतप्त झालेले शेतकरी आता आक्रमक झाले असून, या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करत आहेत. बारदाना संपला असेल तर तो तातडीने उपलब्ध करून का दिला जात नाही आणि नेत्यांच्या मालाला झुकते माप का दिले जात आहे, याचे उत्तर केज खरेदी-विक्री संघाने देणे गरजेचे आहे. अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाला प्रशासनाला सामोरे जावे लागेल

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button