राजकारण

नामदार शरद पवार व लोकनेते गोपिनाथराव मुंडेच्या विचाराचे बीड जिल्ह्यामधे धिंडवडे

बीड जिल्हा भाजप मुक्त होणार ?

 

नामदार  शरदचंद्र पवार, लोकनेते गोपिनाथराव मुंडे यांचा विचाराचा बीड जिल्हा

बीड जिल्ह्यातील विधानसभा निवडणुका पहिल्या टप्प्यात असून भाजपा ०२ जागा राष्ट्रवादी ०४ अशी युती होऊन निवडणूका लढत आहेत मात्र राष्ट्रवादी काँग्रेस चे कार्यकर्ते आष्टी मध्ये व केज मध्ये पण भाजपा उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी करण्याच्या मार्गावर आहेत आष्टी मतदार संघ हा भाजपा ला सुटला आहे तिथे माजी आमदार बाळासाहेब अजबे काका यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे ते उमेदवारी काढणार की बंडखोरी करणार हे आगामी काळात कळेल तसेच जरी उमेदवारी अर्ज काढला तरी ते भाजपा उमेदवार सुरेश अण्णा धस यांच काम करतील की नाही याबद्दल शंका आहे ,तसेच केज मतदार संघात पण राष्ट्रवादी काँग्रेस चे कार्यकर्ते (अ.प) स्थानिक आमदार नमिता मुंदडा यांच्या विरोधात बोलताना दिसत आहेत केज मतदार संघातील पालकमंत्र्याकडुन  आर्थिक लाभ मिळालेले कार्यकर्ते व त्यांची सोशल मिडिया चालवणारी टीम दररोज आ. नमिता मुंदडा यांच्या विरोधात बदनामी करणारी कट कारस्थाने करताना दिसत आहे तसे पाहिलं तर केज मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस(अ.प.) ची ताकत नगण्य आहे व जे कार्यकर्ते पालकमंत्र्याच्या  माध्यमातून वाल्मिक (अण्णा) कराड यांनी सांभाळली आहेत त्यांची जनमानसातील प्रतिमा फार चांगली नाही तसेच यांच्या कार्यकर्त्यांमुळेच खा. बजरंग बप्पा सोनवणे व पालकमंत्री यांच्यात वितुष्ट निर्माण झाले होते हेच कार्यकर्ते भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये वितुष्ट आणणार नाहीत का? अशी चर्चा केज मतदार संघात सुरू आहे कारण आ. सौ. नमिता मुंदडा ह्या एकमेव उमेदवार आहेत की त्यांची शिफारस भाजपा नेत्या आ.सौ. पंकजाताई मुंडे यांनी केली आहे आ.सौ.नमिता मुंदडा व अक्षय मुंदडा हे दोघे आमदार सौ.पंकजाताई यांच्या गुडबॅक मध्ये आहेत तस पाहिले तर आगोदरच बीड जिल्ह्यातील भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.) वर नाराज आहे कारण स्वर्गीय गोपिनाथराव मुंडे साहेबाच्या बालेकिल्ला आसलेल्या भाजपच्या वाट्याला फक्त ०२ जागा मिळाल्या आहेत ज्या बीड जिल्ह्यातुन भाजपाची सुरवात झाली ज्या लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी बीड जिल्हा हा भाजपा चा बालेकिल्ला बनवला होता तिथं ही दुर्दैवी वेळ आली तर पाहिलं राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फूट पडल्यानंतर बीड जिल्ह्यात अजितदादा गटाच्या काँग्रेस ची ताकत खूपच कमी आहे तर पाहिलं तर बीड जिल्ह्यातील मराठा समाज हा शरद पवार यांना मानणारा आहे त्यामुळे भाजपा च्या मतांवर निवडणूक लढवणारी अजितदादा यांची राष्ट्रवादी आयत्या बिळात नागोबा अशी अवस्था झाली आहे कारण बीड जिल्ह्यातील वंजारा समाज हा लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे नंतर आ.सौ. पंकजाताई मुंडे यांना मानणारा आहे हे कोणी नाकारू शकत नाही त्यामुळे बीड जिल्ह्यातील भाजपा अस्वस्थ आहे पण ते आ.पंकजाताई मुंडे यांच्या भूमिकेमुळे शांत आहेत आणी जर त्यामध्येच राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे कार्यकर्ते जर भाजपा उमेदवाराच्या विरोधात बोलत असतील किंवा सोशल मिडियावर बदनामी करत असतील तर ही गोष्ट नक्कीच आ पंकजाताई मुंडे यांना पटणारी नाही कारण ताई ह्या सरळ मार्गी चालणाऱ्या नेत्या आहेत त्यामुळे पालकमंत्री श्री.धनंजय मुंडे याकडे कसे लक्ष देणार हे आगामी काळात लक्षात येईल.

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button