बीड :- लाखोंच्या संख्येने मराठे या बीडमधील शांतंता रॅलीमध्ये सहभागी झाल्याचे पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या रॅलीला मराठ्याचा तुफान प्रतिसाद मिळाला असल्याने या शांतता रॅलीला रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली आहे. त्यामुळे बीडमधील सर्वच रस्ते जाम झाले आहेत. बघा खास दृश्य
मनोज जरांगे पाटील यांची आज बीडमध्ये शांतता रॅली आहे. लातूर, धाराशिवनंतर मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली बीडमध्ये रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. यासाठी मराठ्यांनी जय्यत तयारी केल्याचे पाहायला मिळत आहे. लाखोंच्या संख्येने मराठे या बीडमधील शांतंता रॅलीमध्ये सहभागी झाल्याचे पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या रॅलीला मराठ्याचा तुफान प्रतिसाद मिळाला असल्याने या शांतता रॅलीला रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली आहे. त्यामुळे बीडमधील सर्वच रस्ते जाम झाले आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीवर मनोज जरांगे पाटील यांच्यासह समस्त मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. त्यामुळे बीड शहरात मोठा पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळत आहे. इतकंच नाहीतर तब्बल पाच हजार स्वयंसोवर देखील मदतीला असणार आहेत सगे सोयऱ्यांनाही मराठा आरक्षण लागू करण्याचा अध्यादेश जारी करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 13 जुलैचा अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे 13 तारखेला नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे
क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल
आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा
जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका
जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल