
मतदाना दिवशी सकाळी उठल्यावर सगळ्यात पहिल्यांदा रात्रीच्या अंधारात उमेदवाराने तुमची मतं विकत घेण्यासाठी वाटलेल्या पैशांना नमस्कार करा.
लाईटचे बटण चालू करून १० ते ३५% वीजदरवाढ केल्यामुळे देशात सर्वात महागडी वीज खरेदी करावी लागत असल्याबद्दल लाईटच्या मीटरला नमस्कार करा.
अंघोळीला गेल्यावर साबण, शाम्पू, वॉशिंग पावडर २०-३०% ने महाग झाल्याबद्दल त्यांना नमस्कार करा.
भ्रष्टाचाराच्या पापाच्या पैशातून माता भगिनींना फुकट वाटलेल्या साडीला हळद कुंकू वाहून नमस्कार करा.
छत्रपती शिवाजी महाराजांचा भ्रष्टाचारामुळे पडलेला पुतळा, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महापुरूषांबद्दल केली गेलेली बेताल वक्तव्ये ज्या टीव्हीत पाहिली त्या टीव्हीला नमस्कार करा.
चहा करायला गेल्यावर महाग झाला म्हणून परवडत नसलेल्या गॅस सिलिंडरच्या टाकीला नमस्कार करा.
शेतकऱ्यांकडून कमी पैशात खरेदी करून व्यापाऱ्यांना दुप्पट पैशात विकल्या जाणाऱ्या दुधाला नमस्कार करा.
महागाई दुप्पट वाढल्यामुळे काटकसर करून घरात आणलेल्या तेल, डाळी आणि किराणा वस्तूंना नमस्कार करा.
घराबाहेर पडल्यावर गाडी सुरू करताना महाग झालेल्या पेट्रोल, डिझेलच्या टाकीला नमस्कार करा.
ठेकेदाराकडून कमिशन खाऊन बनवलेल्या करोडोंच्या रस्त्यावर येऊन त्यात पडलेल्या खड्ड्याला नमस्कार करा.
राज्यातील उद्योगधंदे बाहेरच्या राज्यात गेल्याने आणि नवीन रोजगार न आल्याने अजूनही गावात बेरोजगार म्हणून फिरणाऱ्या आपल्या तरूण मित्रांना नमस्कार करा.
शेतात एखादा फेरफटका मारून हमीभाव न मिळणाऱ्या पिकाला, महाग झालेल्या खतांना आणि शेतीच्या औषधांना नमस्कार करा.
मतदान केंद्रावर गेल्यानंतर जातीजातीत अन् धर्माधर्मात भांडण लावणाऱ्या, शेतकरी आणि संविधान विरोधी, आरक्षणावरून फसवणूक करणाऱ्या, पन्नास खोके एकदम ओके, मलिदा गँग, पक्षचोर आणि चिन्हचोर अशी ओळख असणाऱ्या तसेच दादागिरी, दमदाटी आणि दडपशाही करून गोरगरीब लोकांवर गुरगुरणाऱ्या नेत्यांच्या गावपुढाऱ्यांना स्मितहास्य करून नमस्कार करा.
मतदान यंत्रासमोर गेल्यानंतर आपल्या भावी पिढीचे, भावी महाराष्ट्राचे चित्र डोळ्यांसमोर आणून आपल्या आयुष्यात आणि राजकीय परिस्थितीत बदल घडवण्याची ताकत असणाऱ्या मतदान यंत्राला नमस्कार करा.
तुतारी वाजवणारा माणूस / हाताचा पंजा / मशाल यापैकी जे चिन्ह दिसेल, त्यासमोरील बटण दाबून रुबाबात बाहेर या.
ज्याक्षणी तुम्ही मतदान करून बाहेर याल, त्याक्षणीच महाराष्ट्राचे राजकारण नासवणाऱ्या, महाराष्ट्रातील ‘म’ पेक्षा गुजरातचे ‘शेन’ आवडणाऱ्या, उपकारकर्त्यांवरच उलटणाऱ्या, आरक्षण मागणाऱ्यांची दिवसाढवळ्या फसवणूक करणाऱ्या, महाराष्ट्राची फाळणी करू म्हणणाऱ्या, इडीची भीती घालणाऱ्या आणि त्याला घाबरून पळ काढणाऱ्या, समाजासमाजात तेढ निर्माण करणाऱ्या, तरुणांना बेरोजगार ठेवणाऱ्या, महिलांना अत्याचारावर मौन बाळगणाऱ्या, लोकांनी तळागाळात फिरून कष्टाने उभा केलेला पक्ष फोडणाऱ्या, चिन्ह चोरणाऱ्या, महाराष्ट्रद्रोही, पळपुट्या, गद्दार, लाचार, मलिदाप्रेमी, ठेकेदारप्रेमी, कमिशनप्रेमी लोकांचा तुम्ही सुपडा साफ केलेला असेल.
मतदान नक्की करा…



