सामाजिक

ग्राम महसूल अधिकारी संजय तात्याराव शिंदे यांचा उत्कृष्ठ ग्राम महसुल अधिकारी म्हणून सन्मानीत

अंबाजोगाई उपविभागात सर्वप्रथम

केज :- दि.०१/०८/२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय बीड च्या वतीने महसूल दिन गेवराई जिल्हा बीड येथे संपन्न झाला. कार्यक्रमाला गेवराई विधानसभेचे आमदार श्री.विजयसिंह पंडित बीडचे जिल्हाधिकारी मा.विवेक जॉनसन बीड जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी श्री. जितीन रहमान जिल्ह्यातील सर्व अप्पर जिल्हाधिकारी, सर्व उपजिल्हाधिकारी, सर्व तहसीलदार नायब तहसीलदार यांच्या सह सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या दिनी वर्षभरात उत्कृष्ठ काम केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सत्कार करण्यात येतो. यात अंबाजोगाई उपविभागात तहसिल कार्यालय केज येथे कार्यरत असलेले शेतकऱ्यांप्रती स्नेहभाव व जिव्हाळा जपणारे ग्राम महसूल अधिकारी संजयकुमार तात्याराव शिंदे सन २०१३  साली महसूल सेवत तलाठी पदावर तहसिल कार्यालय केज येथे रुजु झाले. आजपर्यंत तालुक्यातील अनेक सज्जा वर त्यांनी आपल्या कामाची छाप सोडली आहे.कायद्याचा चौकटीत राहून शेतकऱ्याच्या अडचणी सोडवणारा अवलिया अशा स्वरूपाचे त्यांचे काम राहिले आहे. शासनाचया योजना गतिमानतेने व पारदर्शीपणे, लोकांच्या पर्यंत पोहचवण्याचे काम करत आहेत. लोकाभिमुख शासनाचा प्रतिनिधी म्हणून गाव पातळीवर त्यांचे काम उल्लेखनीय आहे. एकूणच त्यांच्या कामाची पावती म्हणून त्यांना सन २०२४-२०२५  चा उत्कृष्ट ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार देवून मा. जिल्हाधिकारी बीड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button