क्राईम

वाल्मिक कराडला पुणे येथुन अटक; सि आय डी पथकाची जबरदस्त कार्यवाही

  • केज:- मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप होत असलेला वाल्मिक कराड याला पुणे येथून अटक करण्यात आली आहे. सीआयडीच्या पथकाने ही कारवाई केल्याची माहिती आहे.
    वाल्मिक कराड याच्यासह फरार आरोपींची संपत्ती देखील जप्त करण्यात आली आहे. तसेच वाल्मिक कराड याच्या नातेवाईकांची देखील बँक खाती गोठवण्यात आली आहेत. वाल्मिक कराड याचेही बँक खाते गोठवण्यात आले आहे.

देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी

फरार आरोपी क्रमांक १ – सुदर्शन घुले

फरार आरोपी नंबर २ – कृष्णा आंधळे

फरार आरोपी नंबर ३ – सुधीर सांगळे

जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले, विष्णू चाटे या चौघांना पोलिसांनी आधीच अटक केलीय. तसेच या प्रकरणात मास्टरमाईंड म्हणून वाल्मिक कराडच नाव घेतलं जातय. विरोधकांसह सत्ताधारी आमदारांनी देखील वाल्मिक कराडवर या हत्या प्रकरणात संशय व्यक्त केला आहे. असं असलं तरी पोलिसांनी वाल्मिक कराडवर फक्त खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे वाल्मिक कराडला कोणत्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आलीय का ? हे पाहणे महत्वाच ठरणार आहे.

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button