Uncategorized

तब्बल ६० वर्ष बालाजीची वारी केल्याबद्दल केजचे रामेश्वर जाजु यांचा राजस्थानी यात्री महासंघातर्फे जाहीर सत्कार

 

केज :-राजस्थानी यात्री संघ (तिरुपती बालाजी) येथे माजी बीड जिल्हा उपाध्यक्ष रामेश्वर जाजू यांचा सलग सेवेचे ६० वर्षे वारी झाल्याबद्दल संघातर्फे सन्मानीत करण्यात आले. राजस्थानी सेवा संघ तिरुपती बालाजी येथे यावर्षाचे २०२५ चे वार्षिक ब्रम्होत्सवानिमित्त गेली ४० वर्षापासुन सेवा चालु आहे. तसेच बालाजीला आपल्या बीड जिल्ह्यामधुन गेली ६० वर्षे अखंडीत वारी सेवा केल्याबद्दल या कार्याची दखल घेऊन या संघाने आपल्या बीड जिल्ह्यातील केज येथील माहेश्वरीचे माजी जिल्हाध्यक्ष रामेश्वर जाजू यांचे यथोचित शाल, श्रीफळ, मानचिन्ह देऊन सन्मान करुन गौरवित केले. रामेश्वर जाजु हे समाजसेवक महेश जाजु व माहेश्वरी महासंघाचे तालुकाध्यक्ष मनिष जाजु यांचे वडिल आहेत या
प्रसंगी संघाचे अध्यक्ष विवेक नावंदर, प्रदेशचे संयुक्तमंत्री जुगलकिशोर लोहिया, प्रदेश जनसंपर्कमंत्री ओम तापडिया, सचिव ओमप्रकाश डागा, विनोद भंडारी, वल्लभ बांगड तसेच सर्व पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. त्यांचे या सन्मानाबद्दल जिल्हातून सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button