सामाजिक

केज शहरातील शासकीय जागेवर झालेले अतिक्रमण लवकरच हटविण्यात येणार आ.नमिताताई मुंदडा

केज:- आ.नमिताताई मुंदडा यांनी केज जिल्हा परिषद माध्यमिक शाळा वाचवण्यासाठी विेधान सभेत प्रश्न मांडून शासनाचे लक्ष वेधले त्यामुळे केज जिल्हा परिषद माध्यमिक शाळेचे माजी विद्यार्थ्यानी त्यांचे आभार व्यक्त केले व त्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की केज शहरातील विविध ठिकाणच्या सरकारी जागेवर झालेले अतिक्रमण काढण्यासाठी लवकरच सर्व शासकीय अधिकारी व केज शहरातील प्रमुख लोकांची एक बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे त्यावेळी केज तहसिलच्या जागेवर झालेले अतिक्रमण पशूवैद्यकीय दवाखान्याच्या जागेवर झालेले अतिक्रमण केज ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात झालेले अतिक्रमण जिरायत खात्याच्या जमिनीवर झालेले अतिक्रमण तहसीलच्या गोडावुन वर झालेले अतिक्रमण पाटबंधारेच्या (इरेगिशन) जागेवर झालेले अतिक्रमण अश्या विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहेत

यावेळी अंबाजोगाई नगरीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष नंदकिशोर काकाजी मुंदडा व शाळेचे माजी विद्यार्थी : गिरीश देशपांडे, सुनील केंद्रे, संजय चौरे सर, हनुमंतराव भोसले सर, केज उपन्न बाजार समितीचे उपसभापती डॉ. वासुदेव नेहरकर, वैद्यनाथ बॅकेचे संचालक प्रवीण देशपांडे.
प्रकाश मुंडे, विनोद शिंदे , पिंटू पाटील, समिर देशपांडे, महेश जाजू, दिनकर राऊत , सतिष टोपे सर,समयोदीन इनामदार, विनायक नेहरकर, सुंदरराव  तपसे, सचिन नेहरकर.
​अधिकारी व अतिथी: गटविकास अधिकारी नागरगोजे साहेब, रहेकवाल सर,बारामतीचे शिंदे पत्रकार, बारामती रोटरीचे अध्यक्ष आणि बहुसंख्येने माजी विद्यार्थी उपस्थित होते.
​कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे उपस्थित माजी विद्यार्थ्यानी केले सूत्रसंचालन हनुमंत भोसले सर यांनी केले, तर प्रस्ताविक गिरीश देशपांडे यांनी केले.

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button