Uncategorized
फटाके खरेदीसाठी ‘तेरखेड्याला’ जाऊ नका! गुंडगिरी आणि लुटीचा अड्डा बनलेल्या बाजारात निष्पाप कुटुंबावर जीवघेणा हल्ला
"तेरखेड्याला फटाके खरेदीसाठी अजिबात जाऊ नका!" लुटीचा बजार अन् गुंडगिरीचा कहर; कुटुंबाला बेदम मारहाण

तेरखेड्यात फटाके खरेदीसाठी गेलेल्या कुटुंबावर दुकानदाराचा हल्ला; महिला, मुले व दिव्यांगाला मारहाण
तेरखेडा (जि. धाराशिव):
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर फटाके खरेदीसाठी तेरखेडा (ता. वाशी) येथे आलेल्या एका निष्पाप कुटुंबाला अत्यंत संतापजनक व धक्कादायक अनुभवाला सामोरे जावे लागले आहे. भाव न पटल्याने दुसऱ्या दुकानात जात असल्याच्या क्षुल्लक कारणावरून ‘जगदंबा फायर वर्क्स’ या दुकानाच्या मालकाने व कर्मचाऱ्यांनी एका कुटुंबावर थेट हल्ला चढवला. या हल्ल्यात कुटुंबातील महिला, लहान मुले आणि एका दिव्यांग व्यक्तीला बेदम मारहाण व अर्वाच्य शिवीगाळ करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, तेरखेडा येथील फटाके बाजारातील गुंडगिरी आणि फसवणुकीचा पर्दाफाश झाला आहे.
घटनेचा सविस्तर वृत्तांत
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कुटुंब येरमाळा मार्गे जात असताना फटाके खरेदीसाठी तेरखेडा येथील ‘जगदंबा फायर वर्क्स’ या होलसेल दुकानावर थांबले होते.
दुकानातील फटाक्यांचे दर होलसेल भावाप्रमाणे न वाटल्याने आणि किंमत न पटल्याने हे कुटुंब शांतपणे दुसऱ्या दुकानात खरेदीसाठी निघाले होते. मात्र, ग्राहकाने माल न घेता दुसऱ्या दुकानात जाणे दुकान मालकाच्या पचनी पडले नाही. कोणताही वाद नसताना दुकानदाराने आडमुठेपणा करत वाद उकरून काढला वाद वाढवून दुकान मालक व त्याच्या साथीदारांनी कसलाही विधिनिषेध न बाळगता ग्राहकाच्या अंगावर धावून जात प्राणघातक हल्ला केला. यावेळी सोबत असलेल्या महिला, लहान चिमुकली मुले आणि शारीरिकदृष्ट्या दिव्यांग असलेले दाजी यांनाही सोडले नाही. सर्वांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत अत्यंत घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करण्यात आली. भरदिवसा घडलेल्या या गुंडगिरीमुळे महिला व लहान मुले प्रचंड दहशतीखाली आले आहेत.
‘शेकड्या’च्या नावाखाली ६० फटाके; ग्राहकांची उघड लूट
तेरखेडा परिसरामध्ये स्वस्त फटाक्यांच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक करणारी एक मोठी टोळीच सक्रिय झाल्याचे समोर आले आहे.
खोटे आकडे व निकृष्ट माल: कमी दराचे आमिष दाखवून तोफ व बॉम्ब ‘शेकडा’ (१०० नग) म्हणून ग्राहकांच्या माथी मारले जातात. मात्र, पाकीट उघडल्यानंतर त्यात प्रत्यक्षात केवळ ६० नगच निघतात. त्या साठपैकीही ३० फटाके फुसके निघत असून केवळ ३० फटाकेच वाजतात.
दरांमध्ये हातचलाखी: ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक-दोन किरकोळ वस्तूंचे दर थोडे कमी दाखवले जातात, तर उर्वरित सर्व फटाक्यांवर अवाच्या सव्वा व बेभाव दर लावून ग्राहकांचा खिसा कापला जातो.
येरमाळा-तेरखेडा पट्ट्यात व्यसनाधीनतेचे सावट
कमी भावात फटाके मिळतात या एकाच समजुतीपोटी बीड, धाराशिव, सोलापूर आणि लातूर या चारही जिल्ह्यांतील युवक मोठ्या संख्येने तेरखेडा येथे खरेदीसाठी येत आहेत. परंतु, फटाके खरेदीच्या बहाण्याने या भागात वेगळेच गैरप्रकार फोफावले आहेत:
1. मासे आणि मद्यपार्ट्या: तेरखेड्याजवळच असलेल्या येरमाळा येथील मासळीची हॉटेल्स प्रसिद्ध आहेत. येथे दररोज एका एका हॉटेलमध्ये ५ ते ६ क्विंटल मासे फस्त केले जातात.
2. भरकटलेली तरुणाई: फटाके खरेदी, मासे आणि दारूच्या व्यसनात अडकून सकाळी १० वाजता घराबाहेर पडलेली मुले रात्री १० वाजता घरी परततात. यामुळे सणासुदीच्या खरेदीच्या नावाखाली तरुण पिढी व्यसनाधीनतेच्या गर्तेत लोटली जात आहे.



