Uncategorized
रुग्णालयाची बदनामी करणाऱ्यांवर व गोपनीयतेचा भंग करणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी; डॉ. दिनकर राऊत आक्रमक!
आरोग्य सेवेचा बोजवारा उडवण्याचा घाट; अर्धवट क्लिप्स व्हायरल करून रुग्णालयाची बदनामी सुरूच!

केज (प्रतिनिधी):-केज आणि परिसरात सोशल मीडियावर एक अर्धवट व्हिडिओ क्लिप व्हायरल करून रुग्णालयाची आणि वैद्यकीय सेवेची जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा कुत्सित प्रकार समोर आला आहे. या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त करत प्रसिद्ध चिकित्सक डॉ. दिनकर राऊत यांनी यामागील षडयंत्र उघड केले आहे. अर्धवट सत्य दाखवून आणि परिस्थितीचा विपर्यास करून वैद्यकीय क्षेत्राला वेठीस धरणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.
या प्रकरणातील धक्कादायक बाबी खालीलप्रमाणे आहेत:
व्हिडिओचा विपर्यास करून खोटा माहोल: व्हायरल झालेला व्हिडिओ हा संपूर्ण घटनेचा नसून, एका विशिष्ट वादादरम्यानचा फक्त ‘अर्धवट अंश’ आहे. हा तुकडा जाणीवपूर्वक समोर आणून परिस्थितीचा विपर्यास केला जात असल्याचा आरोप डॉ. राऊत यांनी केला आहे.
उपचारावरून निर्माण झालेले मताभेद: रुग्णालयात दाखल केलेल्या एका रुग्णावर व्हायरल तापाच्या उपचाराची पद्धत, तपासण्या आणि पुढील उपचारयोजना यावरून नातेवाईक व रुग्णालयामध्ये काही तांत्रिक मुद्द्यांवर मतभेद झाले होते. याच वादाचा गैरफायदा घेत चुकीची माहिती पसरवली जात आहे.
रुग्णांच्या गोपनीयतेला आणि नियमांना केराची टोपली: रुग्णालयात उपचार घेत असलेल्या प्रत्येक रुग्णाची गोपनीयता आणि खाजगी माहिती सुरक्षित ठेवणे ही वैद्यकीय नैतिकतेची आणि कायद्याची पायभूत अट आहे. मात्र, कोणत्याही पूर्वपरवानगीशिवाय रुग्णालयाच्या आत अनधिकृतपणे व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचे डॉ. राऊत यांनी ठणकावून सांगितले.
मोबाइल हिसकावल्याचा बनाव आणि व्हायरल क्लिप: वादाच्या वेळी कर्मचाऱ्यांनी नियमबाह्य आणि अनधिकृत रेकॉर्डिंग करणाऱ्या व्यक्तीचा मोबाइल बाजूला सारण्याचा किंवा रोखण्याचा प्रयत्न केला. याच प्रसंगाचातुर्याने संपादित करून सोशल मीडियावर फिरवला गेला. हा व्हिडिओ म्हणजे संपूर्ण सत्याचा विपर्यास असून याद्वारे रुग्णालयाची प्रतिमेला मलिन करण्याचा घाणेरडा प्रयत्न सुरू आहे.
परस्परविरोधी तक्रारी दाखल आणि पोलिसांकडून कारवाईची अपेक्षा: या संपूर्ण अनुचित प्रकारानंतर दोन्ही बाजूंनी पोलिसांत परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. डॉ. राऊत यांनी आपली बाजू सविस्तरपणे पोलिसांसमोर मांडली असून, या प्रकरणाची निष्पक्ष व कठोर चौकशी होऊन लवकरच सत्य समोर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.



