Uncategorized

अंतिम निर्णयापर्यंत जागा राखीव ठेवण्याचे आदेश! NT-D मधून Open प्रवर्गात वर्गवारी; क्षितिजा सांगळे यांच्या याचिकेवर औरंगाबाद उच्च न्यायालयाचा अंतरिम आदेश

प्रवेशप्रक्रियेतील प्रवर्गबदलाचा मुद्दा न्यायालयात; अंतिम निर्णयापर्यंत जागा राखीव ठेवण्याचे आदेश!

छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी :-M.Pharmacy प्रवेशप्रक्रियेदरम्यान प्रवर्गबदलावरून निर्माण झालेला महत्त्वाचा वाद आता मुंबई उच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्र मार्च २०२७ पर्यंतचे जोडलेले नसल्यामुळे याचिकाकर्त्या क्षितिजा वशिष्ठ सांगळे यांची NT-D प्रवर्गातून Open प्रवर्गात वर्गवारी (Converted) ग्राह्य धरण्यात आली होती. या निर्णयाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी पार पडली.  

न्यायालयाची सुनावणी आणि निर्देश

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती नितीन बी. सूर्यवंशी आणि न्यायमूर्ती अबासाहेब डी. शिंदे यांच्या खंडपीठासमोर २८ ऑक्टोबर २०२६ रोजी या प्रकरणाची सुनावणी झाली. न्यायालयाने या प्रकरणी महत्त्वपूर्ण अंतरिम आदेश देत, याचिकेवरील अंतिम निर्णय होईपर्यंत NT-D प्रवर्गातील पदव्युत्तर M.Pharmacy ची एक जागा रिक्त ठेवण्याचे निर्देश संबंधित प्राधिकाऱ्यांना दिले आहेत.  

महत्त्वाचे मुद्दे:

 छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय किंवा बीड येथील आदित्य फार्मसी महाविद्यालयातील NT-D प्रवर्गाची एक जागा पुढील आदेशापर्यंत रिक्त ठेवण्यात यावी.  

 ही जागा याचिकेवरील अंतिम निर्णयाच्या अधीन राहणार आहे.  

 न्याय मिळेपर्यंत न्यायालयाने विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीर भूमिका घेतली आहे.  

या संपूर्ण प्रकरणामध्ये याचिकाकर्त्या क्षितिजा सांगळे यांच्या वतीने ॲड. अमिता चाटे यांनी कायदेशीर बाजू मांडली.

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button