Uncategorized
मुंडेंच्या नावानेच केजमधील भेसळबाजांना फुटला घाम! विषारी दूध, खवा आणि बागवानांची रासायनिक फळे विकणारे पळाले; आता जनतेचाच यांच्यावर ‘कायमचा बहिष्कार’!
सावधान केजकर! मुंडेंच्या भीतीने पळ काढलेले दूध, खवा अन् बागवानांचे फळविक्रेते पुन्हा येतील; त्यांच्या दुकानातून वस्तू घेऊन स्वतःचे मरण विकत घेऊ नका!
केज:
जनतेसाठी अत्यंत प्रामाणिकपणे आणि कडक शिस्तीत काम करणारे डॅशिंग अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या कारवाईच्या धास्तीने केज तालुक्यातील भेसळयुक्त पदार्थ विकणाऱ्या दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत. मुंडे यांच्या कारवाईच्या भीतीने केजमधील अनेक भेसळयुक्त दुकानदार, स्विटहोम चालक, बेकरीचालक आणि गुटका विकणारे टपरी चालकांनी आपली दुकाने घाईघाईने बंद करून परिसरातून पलायन केले आहे.
गेल्या काही दिवसांत केज तालुक्यातील जनतेने ही बंद अवस्थेत असलेली दुकाने जवळून पाहिली आहेत. अत्यंत घातक आणि भेसळयुक्त पदार्थ विकून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारे हे व्यावसायिक केवळ कारवाईच्या भीतीने भूमिगत झाले आहेत.
दूध, खवा आणि बागवानांकडील विषारी फळे; आरोग्याशी जीवघेणा खेळ!
या दुकानांमध्ये केवळ वरवरची भेसळ नव्हती, तर थेट नागरिकांच्या आणि लहान मुलांच्या जीवाशी खेळ सुरू होता. दूध आणि खव्यामध्ये घातक रसायनांची भेसळ करून ते नागरिकांच्या माथी मारले जात होते. तसेच, बागवानांकडील फळे देखील आरोग्यासाठी अत्यंत घातक आणि भेसळयुक्त रासायनिक प्रक्रियेचा वापर करून विकली जात असल्याचा प्रकार आता समोर आला आहे. अशा विषारी वस्तू विकून जनतेला आजारपणाच्या खाईत ढकलणारे हे दुधवाले, खवा विक्रेते आणि बागवान मुंडेंच्या भीतीने गाशा गुंडाळून पळाले आहेत.
बदली झाली तरी खरेदी नको; नागरिकांचा महासंकल्प
दरम्यान, प्रशासकीय प्रक्रियेनुसार अधिकारी तुकाराम मुंडे यांची जरी बदली झाली असली, तरी केज तालुक्यातील सुजाण जनतेने आता एक मोठा निर्णय घेतला आहे.
“केवळ अधिकारी बदलला म्हणून या भेसळबाजांचे पाप धुतले जात नाही,” अशी भावना स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
तालुक्यातील जनतेने एकमेकांना आवाहन केले आहे की, जी दुकाने, बेकऱ्या, स्विटहोम आणि खवा-दूध विक्रीची केंद्र कारवाईच्या भीतीने बंद करण्यात आली होती, ती उद्या पुन्हा सुरू झाली तरीही ग्राहक म्हणून आपण अत्यंत सतर्क राहिले पाहिजे. अशा दुकानांमधून किंवा बागवानांकडून कोणत्याही प्रकारचे सामान, खाद्यपदार्थ, दूध, खवा अथवा फळे विकत घेऊ नका, जेणेकरून आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्याला धोका निर्माण होणार नाही.
नागरिकांना जळजळीत आवाहन:
“अधिकाऱ्यांची बदली झाली तरी आपली सतर्कता संपता कामा नये. भेसळयुक्त दूध, खवा आणि रासायनिक फळे विकून आपल्या मुलाबाळांच्या जिवाशी खेळणाऱ्या या पळकुट्या दुकानदारांवर कायमस्वरूपी आर्थिक बहिष्कार टाका आणि त्यांना त्यांची जागा दाखवून द्या



