Uncategorized
घोटाळेबाज अविनाश पाठक यांचा ‘जात प्रमाणपत्र’ घोटाळा उघड!
सवर्ण असताना 'भोपी' असल्याचे भासवून लाटली पदोन्नती; तुळजापूरच्या पुजाऱ्यांच्या अस्मितेवर घाला

लातूर:-बीडचे तत्कालीन वादग्रस्त जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या अडचणीत आता मोठी वाढ झाली आहे. जमीन मोबदला घोटाळ्यानंतर आता त्यांचा ‘जात प्रमाणपत्र घोटाळा’ समोर आला असून, त्यांनी प्रशासकीय सेवेत आणि पदोन्नतीसाठी बनावट कागदपत्रांचा आधार घेतल्याची खळबळजनक चर्चा सुरू आहे.
काय आहे नेमका प्रकार?
मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश पाठक हे मूळचे तुळजापुर चे रहिवासी असून ते ब्राह्मण समाजातील आहेत. मात्र, प्रशासकीय सेवेत प्रवेश मिळवण्यासाठी आणि त्यानंतर ‘आयएएस’ (IAS) केडर तसेच पदोन्नतीचा लाभ घेण्यासाठी त्यांनी आपण तुळजापूर येथील तुळजाभवानी देवीचे ‘भोपी’ पुजारी असल्याचे भासवले. या आधारे त्यांनी ‘भटक्या’ प्रवर्गाचे बनावट जात प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप होत आहे.
महत्त्वाचा मुद्दा: तुळजापूरचे भोपी पुजारी हे ‘मराठा-कुणबी’ जातीचे आहेत. तुळजाभवानी मंदिरात एकही ब्राह्मण पुजारी नाही. असे असताना, मूळचे ब्राह्मण असलेल्या पाठक यांनी आपण ‘भोपी’ असल्याचे सांगून प्रमाणपत्र मिळवलेच कसे, हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. केवळ आरक्षणाचा आणि पदोन्नतीचा गैरफायदा घेण्यासाठी त्यांनी एका विशिष्ट समाजाच्या हक्कावर गदा आणल्याचे बोलले जात आहे.
तक्रार आणि चौकशीची मागणी
लातूर येथील आरटीआय कार्यकर्ते आणि सेवानिवृत्त अधिकारी विठ्ठल भोसले यांनी यापूर्वीच पाठक यांच्या बनावट जात प्रमाणपत्राबाबत जात पडताळणी विभाग आणि महसूल विभागाकडे तक्रार दाखल केली आहे.
“अविनाश पाठक यांनी जाणीवपूर्वक खोटी माहिती देऊन शासनाची फसवणूक केली आहे. सवर्ण त्यांनी मराठा-कुणबी समाजाशी संबंधित असलेल्या ‘भोपी’ जातीचा आधार घेऊन पदोन्नती लाटली आहे, याची सखोल चौकशी होऊन त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी,” अशी मागणी आता जोर धरत आहे.
या प्रकरणामुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली असून, पाठक यांच्यावर आता कोणती कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे



