Uncategorized
“जात बघून विकास होत नसतो, जननायक व्हा, जातनायक होऊ नका!”
"गोरगरीबांना लुटून गुन्हेगारीला 'राजाश्रय'; बीडच्या 'शिधाधारक' नेत्यांनी जिल्ह्याला मेटाकुटीला आणले!"
बीड: एकेकाळी राज्याच्या राजकारणात दबदबा असलेल्या बीड जिल्ह्याला सध्या जणू कुणी ‘वाली’च उरलेला नाही, अशी भयावह स्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे डिझेल-पेट्रोलसाठी सामान्य जनतेला उन्हातान्हात लांबच लांब रांगा लावाव्या लागत आहेत, तर दुसरीकडे जिल्ह्यातील नेतेमंडळी मात्र विकासकामांपेक्षा स्वतःच्या सत्ता आणि पदाच्या पळापळीत मग्न असल्याचे चित्र दिसत आहे.
नेत्यांची निष्ठा फक्त निवडणुकीपुरतीच?
निवडणुकीच्या काळात जनतेवर प्रेमाचा वर्षाव करणारे लोकप्रतिनिधी आता गायब झाले आहेत. जनतेचा प्रश्न मांडण्याऐवजी, “मला काय मिळेल?” या मानसिकतेत अडकलेल्या नेत्यांमुळे जिल्ह्याची अधोगती होत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील नेते पक्षाभेद विसरून विकासासाठी एकत्र येतात, मात्र बीडचे नेते केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी दिल्ली-मुंबईच्या वाऱ्या करण्यात धन्यता मानत आहेत.
गुन्हेगारी आणि सत्तेचा खेळ
संतोष देशमुख हत्याकांडानंतर जिल्ह्याच्या राजकारणाला लागलेली उतरती कळा अजूनही थांबलेली नाही. तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी गुन्हेगारीला दिलेल्या ‘राजाश्रया’मुळे आणि भ्रष्टाचाराच्या अतिरेकामुळे आज संपूर्ण जिल्हा मेटाकुटीला आला आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी जाती-पातीत भांडणे लावून आपली पोळी भाजण्याचे काम काही नेते करत असल्याचा थेट आरोप आता जनता करत आहे
” बघून विकास होत नसतो, जननायक व्हा, जातनायक होऊ नका!”



