सामाजिक

अहमदनगरची निजामशाही आणि हैदराबादी निझाम!

जनतेला अहमदनगरची निजामशाही आणि हैदराबादी निझाम यांतील फरक ठाऊक नाही. हे दोन्ही वेगवेगळे आहेत.

अहमदनगरची निजामशाही स्थापन करणारा मूळ व्यक्ती मलिक अहमद हा पाथरीच्या बैरामपंतांचा नातू होता. बैरामपंताचा मुलगा तिमाजीपंत कुलकर्णी होता. विभिन्न पुस्तकांतून बहिराम भट, बहिरम भट, तिमाप्पा असे पाठभेद आढळतात. काहीही झालं तरी ते देशस्थ यजुर्वेदी ब्राह्मण वंशातील होते एवढं खरं.

दक्षिणेत जेव्हा कर्नाटकातील हसन गंगू नावाच्या ब्राह्मणांनं मुसलमानी धर्म स्विकारुन आपले स्वतंत्र संस्थान घोषित केले तेव्हा त्याच्या राज्याला ब्राह्मनी सल्तनत म्हणून ओळखलं जाऊ लागलं. मुस्लिम लेखक त्यालाच बम्मनी असा उल्लेख करत तर ब्राह्मणी इतिहासकारांनी परवा परवा पर्यंत ब्राह्मणी सल्तनत असाच उल्लेख केलेला आढळतो. ब्राह्मणीचं बहामनी केलं गेलं त्याला फार तर शंभरेक वर्षे झाली असावीत. भारताच्या इतिहासात अनेक हिंदू लोकांनी आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारला. त्यात हसन गंगू, बंगालचा नवाब, अयोध्येचा नवाब, एलिचपूरचा इमाद असे असंख्य लोक आहेत. याच ब्राह्मणी सुलतानशाहीच्या मांडलिकापैकी एक म्हणजे तिमाजी पंत कुलकर्णी हा मुस्लिम झाला व हळूहळू मोठ्या पदावर पोचला. त्याचा मुलगा मलिक अहमद निजाम. तो ब्राह्मणी सुलतानशाहीच्या काळात लढाईसाठी म्हणून जुन्नरला आला आणि जुन्नरच्या किल्यावर असलेल्या खजिन्याचा मालक बनला. तो इकडंच स्थाईक झाला. पहिल्यांदा जुन्नर, नंतर अहमदनगर, पुन्हा परांडा, कधी औसा अशाप्रकारे काही काळ ही राजधानी बदलत असायची. तरीही मुख्य ठाणे नगरलाच होते.

लोकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की स्थानिक धर्मांतरित मुसलमान राज्यकर्ते हे इथल्याच मातीतून उपजले असल्याने ते धार्मिक बाबतीत तुलनेने विदेशी मुसलमानी राजवटीपेक्षा बरेच मवाळ ठरतात. हैदराबादी राजवट असफजाही मुस्लिम वंशाची होती. तर अहमदनगरी निजामशाही स्थानिक धर्मांतरित मुसलमानी वंशाची होती. (दोन्ही सत्तेत पेशव्यापासून ते सामान्य कोतवालापर्यंत मोठ्या प्रमाणावर हिंदू लोक होतेच.) त्यामुळे हैदराबादी संस्थानातील जनतेला अहमदनगरी निजामशाही जनतेपेक्षा जास्त जाच सहन करावा लागला.

अहमदनगरची निजामशाही ही भारतीय हिंदू लोकांसाठी इष्टापत्ती ठरली. या राज्यात स्थानिक मुसलमान, स्थानिक हिंदू, आफ्रिकन हबशी सिद्धी यांना आपापली कर्तबगारी सिद्ध करून दाखवायची संधी मिळाली. त्यांना कर्तबगारीवरुन मोठी पदं मिळाली. त्यामुळे, आपणही सत्ताधारी बनू शकतो असा एक उजेडाचा कवडसा स्थानिक हिंदू लोकांना दिसू लागला. शहाजी महाराजांनी पहिल्यांदा स्थापन केलेली निजामशाही हा एक तसलाच अयशस्वी प्रयत्न होता. निजामशाही वंशातील एका दूरच्या मुलाला मांडीवर बसवून शहाजी राजे चक्क राजसिंहासनावर बसून इतर मुस्लिम आणि हिंदू सरदारांचे मुजरे स्विकारु लागले, तेंव्हाच स्वराज्याचा सूर्योदय आता फार दूर नाही याची जाणीव शहाजी राजे आणि जिजाऊ माॅंसाहेब यांना झाली होती. तिथून केवळ चाळीस वर्षांतच शिवाजी महाराजांच्या रुपात स्वराज्य सूर्याचा प्रकाश लोकांनी बघितला. त्यापूर्वीची ही कसरत आणि ध्यानात घेत नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्य स्थापनेच्या कार्यातील महानायक असले तरी, शहाजी राजे व जिजाऊ माॅंसाहेब हे या कार्याचे दिशादर्शक निर्माते ठरतात. एक प्रकारे नगरची निजामशाहीच स्वराज्य निर्मितीची प्रयोगशाळा ठरली.

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button