संपादकीय

केज शहरातील विकासच्या विविध प्रश्नावर आंदोलन करणारे प्रा.हनुमंतराव भोसले सरांना अनावृत पत्र

केज शहराला लागलेला शॉप अतिक्रमनाचा प्रचंड विळखा

केज :- केज शहरातील विविध प्रश्नावर सतत आवाज उठवुन जनतेला दिलासा मिळेल या आशेवर ते आंदोलने करत आसतात पन भोसले सरांना प्रत्येक विकासाचे प्रश्न का सुटत हे पन माहीत आहेत पन राजकीय लोकांनी बेकायदेशीर केलेली कामे सांगण्याचे धाडस दाखवत नाहीत कारण त्यांना लोकशाही मार्गाने न्याय मिळेल या आशेने प्रमाणिक प्रयत्न करताना दिसत आहेत भोसले सर तुम्ही गेली २० वर्षापासुन नगरपंचायत ची निवडणुक लढवतात पन पैसे नसल्यामुळे तुम्ही निवडणुक जिकंलेली नाही ज्या जनतेसाठी आंदोलन करतात ती जनतेने मताला पैसे दिले नाहीत म्हणुुन नाकारते हे वाईट आहे
या उलट आर्थिक बाजु घट्ट करण्यासाठी  सर्व पक्षीय राजकीय लोकांची लॉबी फार मजबुत आहे अन यांना जनतेने जात बघुन निवडून दिलेले खासदार, आमदार, नगरसेवक किंवा इतर लोक प्रतिनिधी असो हे प्रचंड प्रमाणात मतदाराना एका मतासाठी पाच पाच हजार रुपये मोजुन मत विकत घेऊन निवडून येतात हे विदारक सत्य मान्य करावे लागेल जर मतदारानी पैसे घेऊन मतदान केले आसेल तर या लोकप्रतिनिधी नव्हे(पैसेप्रतिनिधीना) कोणत्या तोंडाने कामे सांगतील हे पदाधिकारी काय समाजसेवक आहेत का हे तर गेलेले पैसे काढण्यासाठी पाच वर्ष जबरदस्तीने वसुली करत आहेत अन पुढच्यावेळी अजून डबल पैसे मतदाराना द्यावे लागणार हे त्यांना चांगलेच माहीत आहे जेथे चांगले पैसे मिळतात ते जनतेची मागणी नसताना कामे केलेली दिसतात तुम्ही जे आंदोलन करतात तेथे यांना पैसेच मिळणार नाहीत मग त्या प्रश्नावर ते कधी गूळणी फोडायला तयार नसतात १)बस डोपोचा प्रश्न त्यांना कधी एसटीत बसायचे नाही तो प्रश्न सुटायचा प्रश्नच नाही
२)धनेगाव पाणी प्रश्न नवी पाईप लाईन दर्जेदार करावीच लागते तेथे पैसे मिळणारच नाहीत त्यातच हे कधी धनेगावचे पाणीच पित नाहीत तर प्रश्न कशामुळे सोडवायचा
३)जिरायत खात्याचा व्यापारी संकुलचा प्रश्न सर्व पक्षीय पैसे प्रतिनिधीना किती गाळे मिळणार हे निश्चित झाल्यावरच हा प्रश्न निकाली निघेल नाहीतर श्रेयवादाची लढाई खेळुन हा प्रश्न रेगाळत ठेवणार
४) केज शहराला अतिक्रमानाचा विळाखा पडला आहे तो सर्वाना फक्त रोजीरोटी कमवणारे रोड वरचेच दिसत आहे पन शासकिय कार्यालय आसलेल्या जागेवर न भिता केलेली अतिक्रमण केलेली कार्यालये दिसत नाहीत का?
१)हे पन बघा पोलीस स्टेशनला ८ एक्कर जागा आसताना ३ एक्करवर अतिक्रमणे करुन अलिशान बंगले दुकाने बांधलेले आहे हे दिसत नाही का?
२) लघु पाटबंधारे कार्यालय(ईरिगेसन) ६ एक्कर जागा आसताना २ एक्करवर अतिक्रमन करुन अलिशान घरे बांधण्याचा सपाटा लावलाय हे दिसत नाही का?
३)तहसिल कार्यालय ८ एक्कर जागेवर तहसिल कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय, भुमिअभिलेख कार्यालय,शासकिय कार्यालय, मंडळाधिकारी कार्यालय,केज तलाठी कार्यालय व शासकिय निवास, हे सर्व कार्यालय आहेत त्यातच एका जागा मालकाला फक्त दिड गुंठ्ठा जमिन कोर्टाने दिली आसताना या महाशयाने १ एक्कवर शासकिय कंपाऊड दिवसाच तोडून दुकाने थाटली हे दिसत नाही का?
४)पशुवैदकिय दवाखाना या जागेवर एक शासकिय पशुवैदकिय दवाखाना व एक पशुवैदकिय डॉक्टरला निवासस्थान आहे व बाकी मोकळी जागा मोकळ्याजागेवर राजोरोस पन जवळपास ५० जन पारधी समाज हातभट्टी काढून विकत आहेत त्याउपर या डॉक्टरच्या निवासस्थानावर एका मुर्खाने ताबा करुन चक्क दुकानच किरायाने दिले हे सर्वाना दिसत नाही का?
५) केज कृषी उपन्न बाजार समितीला ११ एक्कर जागा शासनाने दिली आहे तरीही आज पर्यत सातबारावर आलेली नाही त्यांचा फायदा घेऊन काही जनानी अतिक्रमन केलेले आहे हे दिसत नाही का?
६)सरकारी गायरान सर्वे नंबर १०० वर क्रांतीनगर च्या नावाखाली पारध्यानी १० एक्कर वर अवैध ताबा करुन सौरउर्जा प्रकल्प रोखला आहे व सरकारी गायरान बीड रोडवर ३०/२व३०/१वर ताबा घेण्यासाठी खालसा करुन येवता येथे घेतली अन तेथली पन जमिन विकली अन ही पन जमिन विकली हे दिसत नाही का?
७)शासकिय दुध डेअरीला २ एक्कर जागा आसताना एक एक्करवर अतिक्रमन केले ते दिसत नाही का?
८)सर्वे नंबर ३१ वर उमरी रोडच्या जिल्हा परिषदच्या वस्ती शाळेवर ताबा करुन जनावरे बांधण्यासाठी अतिक्रमन केले हे दिसत नाही का?
९)केज शहरातील स्मशान भुमिच्या अनेक जागेवर दुकाने थाटली आहेत हे दिसत नाही का?
१०)केजडी नदीचा प्रवाह बदलुन २ एक्कर जमिनीवर ताबा केला ते दिसत नाही का?
११)खादी ग्रामउद्दोग सर्वे नंबर १०५ वर २ एक्कर जागेवर (वकिलवाडीच्या पाठिमागे) अतिक्रमने करुन नोटरी वर जागा विकण्याचा सपाटा लावला आहे तेथे बांधकामे चालु आहेत हे दिसत नाही का?
१२)जुना कळंब रस्ता,जुना अंबाजोगाई रस्ता,जुना धारुर रस्ता,जुना चिचोंली रस्ता, जुना उमरी रोडवर प्रचंड प्रमानात अतिक्रमने अवैध ताबे करुन घरे बांधली तात्कालीन ग्रामपंचायतच्या मालकीच्या विहिरी बुजवून अतिक्रमने केलेली आहेत यांच्या नोंदी भुमिअभिलेखवर बघायला मिळतील नदी नाले बुजवुन अतिक्रमने केलेली आहेत हे अतिक्रमन ज्यांनी केलेली आहेत हे राजकिय नेत्यांच्या जवळचीच आहेत मग भोसले सर तुम्ही कुठे कुठे टाहो फोडणार आहेत निगरगट्ट लोक अन मताला पैसे घेणारीच जनता बळी पडणारच अन पैसेप्रतिनिधी फायदा घेऊन आहे तेथेच बागडणारच हे लक्षात घ्या
मि खरच बोलणार अन बोलत राहणार वरील अतिक्रमन केलेली व्यक्ती पन मला माहीत आहे अन पैसे प्रतिनिधी कुठे कुठे पैसे किती खाल्ले यांची पन यादी मला माहीत आहे अन पैसे खाणारी जनतेची पन यादी माहीत आहे.
जो पर्यत जनता मताला पैसे खाणार नाही तेव्हा विकास होण्यापासुन कुनीही रोखणार नाही.

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button