क्राईम

परळी मारहाण प्रकरणी दहा जण ताब्यात

हाफ मर्डर,बेकायदा जमाव जमवुन मारहान केल्याचा गुन्हा दाखल

केज : शिवराज दिवटे हा युवक शुक्रवारी जलालपूर येथील अखंड हरिनाम सप्ताहातून घरी परतत होता. त्यावेळी परळीतील रिलायन्स पेट्रोल पंपावरुन शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास शिवराज दिवटे याचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्याला टोकवाडी गावातील रत्नेश्वर मंदिराच्या परिसरात नेण्यात आले. तेथे टोळक्यांनी शिवराज दिवटे याला बेदम मारहाण केली. संशयित आरोपींचा जवळपास आठ ते दहा ते पंधरा जणांचा गट होता. त्यात शिवराज याला लाठ्या आणि काठ्यांनी बेदम मारहाण केली जात होती. अगदी दंडाचा जोर लावून टोळके त्याला मारत होते. एकजण बेल्टच्या साह्याने प्रहार करत होता. यावेळी शिवराज जमीनीवर आडवा पडलेला होता. तेव्हा अनेक जण तरुणाला अमानुष मारहाण करत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना असून दहा ते पंधरा जणांचे टोळके अपहरण करुन आणलेल्या एका तरुणाला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण करत असल्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 

परळी मारहाणप्रकरणी दहा जण ताब्यात

परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होताच तातडीने पावले उचलत पोलिसांनी तेलगाव येथून चौघांना अटक केले असून इतर सहा जनाना परळी परिसरातून अटक केले आहे. आतापर्यंत या प्रकरणात दहा जणांना अटक करण्यात आले असून उर्वरित आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. याप्रकरणी परळी संभाजीनगर पोलीस ठाण्यात समाधान मुंडे, रोहित मुंडे, आदित्य गीते, ऋषिकेश गिरी, प्रशांत कांबळे, सन्मित्र शिंदे, सौमित्र गोरे, रोहन वगळकर, सुरज मुंडे, स्वराज्य गीते असे दहा आरोपी आणि अनोळखी दहा अशा एकूण वीस जणांवर बीएनएस कलम १०९, १२६(२), १४०(३), ११८(१),१८९(२),१८९(४),१९०,१९१ (३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास संभाजीनगर पोलीस करत आहेत

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button