सामाजिक

तहसीलदार राकेश गिड्डे यांचा मृत्यू ‘अपघात की घातपात?’; संभाजी ब्रिगेडकडून उच्चस्तरीय चौकशीची मागणी

केज: केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या अपघाती निधनाबाबत जनमानसात मोठी शंका असून, या प्रकरणाची सखोल, निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करण्यात यावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
‘अपघात की घातपात?’ संशयाची सुई
संभाजी ब्रिगेडने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तहसीलदार राकेश गिड्डे हे एक कर्तव्यदक्ष, प्रामाणिक आणि अन्यायाविरोधात ठाम भूमिका घेणारे अधिकारी होते. त्यांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. मात्र, या घटनेबाबत अनेक संशयास्पद बाबी समोर येत आहेत. विशेषतः अपघातानंतर घटनास्थळावरून त्यांचा मोबाईल फोन आणि महत्त्वाचा डेटा असलेला लॅपटॉप गायब होणे, ही अत्यंत गंभीर बाब आहे.
उच्चस्तरीय चौकशीची मागणी
पत्रात पुढे नमूद करण्यात आले आहे की, हा केवळ एक अपघात आहे की नियोजित घातपात? याबाबत जनतेच्या मनात शंका निर्माण झाली आहे. अपघाताच्या दिवशी त्यांच्यासोबत कोण-कोण व्यक्ती होत्या, याचीही तपासणी होणे आवश्यक आहे. या प्रकरणातील सत्य लवकरात लवकर समोर येणे हीच दिवंगत गिड्डे साहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल.
निवेदनातील प्रमुख मागण्या:
• घटनेची उच्चस्तरीय चौकशी समितीमार्फत चौकशी व्हावी.
• सत्य परिस्थिती लवकरात लवकर जनतेसमोर मांडावी.
• प्रशासनावरील विश्वास कायम राखण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी.
हे निवेदन संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष (पूर्व) राहुल खोडसे, प्रा. महेंद्र मोरे, राहुल डावकूर, नितीन गुजर, जिवन घोलप आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने सादर करण्यात आले असून, याची प्रत पोलीस अधीक्षक, बीड यांनाही माहितीसाठी पाठवण्यात आली आहे.

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button