सामाजिक

घरावर तुळशीपत्र ठेऊन गावाला पाणी पुरवठा करणारा अवलिया सरपंच

खा.बजरंग बप्पा सोनवने च्या मार्गदर्शनाखाली जनतेच्या हिताची कामे करणारा सरपंच

केज :-केज तालुक्यातील सोनिजवळा येथील सरपंचाने स्वःताच्या शेतातील फळबाग बागायती शेतीला पाणी न देता गावासाठी तीन किलोमीटर अंतरावरून गावाची तहान भागवली. बीड जिल्ह्याचे खा. बजरंग बप्पा सोनवने यांच्या मार्गदर्शनाखाली सोनिजवळा येथील सरपंच सौ. जान्हवी गोविंद ससाणे यांनी उन्हाळा चालु झाल्यापासुन आज पर्यंत स्वताच्या पिकाला पाणी न देता रस्त्यातील वस्तीला पाणी देत देत गावात पाणी आणले, भर उन्हाळ्यात गावला पाणी नाही जिल्हा परीषदेची पाणी पुरवठा करणारी धनेगाव योजना सतत बंद पडत असल्याने गावातील लोकांचे होत आसलेले हाल बघवले नाहीत शेतातील पिकाचा मागेपुढे विचार न करता स्वखर्चाने गावासाठी पाणी उपलब्ध करुन दिले, गावातील विंधन विहीरीने गाठलेला तळ, आटलेले आसल्याने त्यामुळे निर्माण झालेली तिव्र पाणीटंचाई या पाईपलाईनने गावकऱ्यांना पाणी उपलब्ध करुन दिले या मुळे पंचक्रोशीतील सुजान नागरिकांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे..

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button