Uncategorized

“भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे… तू फक्त ‘खात’ राहा!”; केज नगरपंचायतीत भ्रष्टाचाराची ‘महाआरती’

केजमध्ये भ्रष्टाचाराचा नंगानाच! 'घरकुलं फस्त, रस्ते गायब'; जनतेच्या हक्काच्या पैशांवर दरोडा?

केज :- “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे… तू फक्त घरकुलाचे पैसे खा, रस्ते-नाल्यांचे बजेट फस्त कर!” असा अभय देणारा वरदहस्त केज नगरपंचायतीत कोणाचा आहे? प्रशासकीय अधिकार्‍यांवर कारवाईची तलवार टांगली जात असली, तरी या भ्रष्टाचाराचे ‘खरे सूत्रधार’ आणि ‘पांढरपेशी राजकीय नेते’ अद्यापही मोकाटच आहेत. केजच्या विदारक परिस्थितीवर आता जनतेनेच संताप व्यक्त करत थेट सवाल विचारला आहे.
पांढरपेशी दरोडेखोरांची ‘अभद्र युती’
केज शहरात गेल्या काही काळापासून विकासाच्या नावाखाली लूट सुरू असल्याचा आरोप होत आहे. गरिबांच्या हक्काची घरकुले, पिण्याच्या पाण्याचा निधी, नाली आणि रस्ते या सर्वच कामांमध्ये भ्रष्टाचाराची वाळवी लागली आहे. केवळ कागदोपत्री घोडे नाचवून सामान्य जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली जात आहे.
अधिकारी तर ‘बळीचे बकरे’, खरे मालक कोण?
अलीकडच्या काळात घरकुलाच्या पैशात अफरातफर करणाऱ्या काही प्रशासकीय अधिकार्‍यांवर कारवाईच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, केजची जनता विचारतेय की:
• कोणाच्या आदेशाने हे अधिकारी भ्रष्टाचाराला धजावले?
• ज्या नगरसेवकांनी आणि नेत्यांनी टक्केवारीचे पाकीट स्वीकारले, त्यांच्यावर कारवाई कधी होणार?
• जनतेच्या हक्काचे पैसे खाणाऱ्यांना पाठीशी घालणारे ‘गॉडफादर’ कोण आहेत?
घरकुल लाभार्थी रस्त्यावर, नगरसेवक मालामाल!
एकडे घरकुलाचा हप्ता न मिळाल्याने गरीब जनता उघड्यावर पडली आहे, तर दुसरीकडे याच पैशांवर डल्ला मारणारे लोक आलिशान गाड्यांमधून फिरत आहेत. “शौचालय खा, पाणीपुरवठ्याचे पैसे खा” अशी जणू मूक संमतीच सत्ताधार्‍यांनी दिल्याचे चित्र केजमध्ये दिसत आहे. भ्रष्टाचाराच्या या साखळीने केजचा विकास खड्ड्यात घातला असून, आता केवळ छोट्या माशांवर कारवाई करून चालणार नाही, तर ‘मोठे मासे’ जाळ्यात येणे गरजेचे आहे.
जनतेचा एल्गार: “आता हिशोब होणार!”
केजची जनता आता शांत बसणार नाही. घरकुलाचे पैसे न मिळालेली पीडित जनता आणि सजग नागरिक आता या भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध एकवटले आहेत. केवळ प्रशासकीय अधिकार्‍यांचे निलंबन करून हा विषय थांबणार नाही, तर या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांना जोपर्यंत बेड्या पडत नाहीत, तोपर्यंत केजचा हा संघर्ष सुरूच राहील.

“प्रशासन केवळ देखाव्यासाठी कारवाई करत असेल, तर तो जनतेचा अपमान आहे. ज्या नेत्यांच्या खिशात घरकुलाची ‘टक्केवारी’ गेली, त्यांना कायद्याच्या पिंजऱ्यात कधी उभं करणार? हाच खरा सवाल आहे!”
— संतप्त नागरिक, केज.

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button