कृषी

शेतकऱ्यांनो फार्मर आयडी काढा शासकीय योजना मिळवा

ग्राहक सेवा केंद्र व तलाठी कार्यालय येथे नोंदणी अनिवार्य

 

बीड : शेतकऱ्यांच्या नावावर शेतजमीन असेल तर त्यांना फार्मर आयडी अर्थात शेतकरी ओळख क्रमांक दिला जात आहे. आयडीमुळे शेतकऱ्यांना कृषीविषयक सेवा, सुविधा तसेच शासकीय योजनांचे लाभ पारदर्शकपणे मिळू शकतील. त्यासाठी ‘अँग्रीस्टॅक’ नावाने डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे. आतापर्यंत बीड जिल्ह्यातील १ लाख ८२ हजार १८१ शेतकऱ्यांना फार्मर आयडी देण्यात आला आहे.

राज्यातील कृषीक्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारकरीत्या शेतकऱ्यांना लाभदेणे सुलभ व्हावे याकरिता केंद्र शासनाकडून अँग्रीस्टॅक योजना राबविण्यात येत आहे. अँग्रीस्टॅक प्रकल्पात प्रत्येक सातबारा धारक शेतकऱ्याला युनिक फार्मर आयडी दिला जात आहे. शेतकरी ओळख क्रमांक तयार करण्यासाठी कॅम्पमध्ये शेतकऱ्यांचा आधार क्रमांक त्यांच्या खाते उताऱ्याला जोडण्यात आला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांचा मोबाइल क्रमांक आधारशी संलग्न असणे आवश्यक आहे. ज्यांच्या नावे सात-बारा नोंद आहे, अशा सर्व शेतकऱ्यांना अँग्रीस्टॅक क्रमांक अनिवार्य आहे. प्रत्येक शेतकऱ्याला फार्मर आयडी दिला जाणार आहे

केज तालुक्यात सर्वाधिक फार्मर आयडी

बीड जिल्ह्यात इतर तालुक्यांच्या तुलनेत केज तालुक्यातील १९ हजार ८७७ शेतकऱ्यांचे फार्मर आयडी काढण्यात आले आहेत. सर्वाधिक कमी आयडी हे वडवणी तालुक्यातील असून त्याची संख्या ७३५० एवढी आहे. आयडीसाठी कॅम्पची संख्या वाढवून मोठ्या प्रमाणात कार्यवाही करणे आवश्यक आहे.

फार्मर आयडी यासाठी महत्त्वाचा

शेतकऱ्यांना पिकासाठी कर्ज मिळवण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड, कृषी इन्फ्रास्ट्रक्चर फंड व शेतीच्या विकासासाठी इतर कर्ज उपलब्ध करून घेण्यास सुलभता येईल. पिक विमा तसेच आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करण्यात सुलभता येईल, किमान आधारभूत किमतीवर खरेदीमध्ये शेतकऱ्यांची नोंदणी करणे ऑनलाइन पद्धतीने होऊ शकेल, शेतकऱ्यांसाठी कृषी कर्ज, निविष्ठा आणि जमिन खरेदी विक्री साठी फार्मर आयडी अनिवार्य राहील व सेवा देणाऱ्या यंत्रणांना कृषी सेवा सहजपणे उपलब्ध होईल.

बीड जिल्ह्यात ३ लाख ८५ हजार २७२ शेतकरी पीएम किसानचा लाभ घेतात. आतापर्यंत जिल्ह्यात १ लाख ८२ हजार १८१ शेतकऱ्यांना फार्मर आयडी दिले असून, टक्केवारी ४७.२९ आहे.

टक्के शेतकऱ्यांना बीड जिल्ह्यात ‘फार्मर आयडी कार्ड’चे वाटप करण्यात आले आहे. उर्वरीत शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात कॅम्प घेणे आवश्यक आहे

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button