Uncategorizedसामाजिक

चिमणी पाखरांची दिवाळी

सुलक्षणा लहु माने बीड

 

लेखाचं नाव चिमणी पाखर ठेवण्याचं कारण आपण कितीही मोठे झालो तरी आपल्या आई-वडिलांसाठी लहानच असतो ते आपल्याला लहान समजतात.
मोठी होतात मुलं आई होत नाही मोठी
घरात एकुलती एक मुलगी असेल तर तिचे खूप लाड केले जातात.
माझे आई-वडील खूप लाड करायचे. माझे घरात सणवार असो काही कार्यक्रम असतो मी सोबत पाहिजे. माझ्यावर खूप प्रेम करणारे आई-बाबा मला सोडून खूप दूर निघून गेले पुन्हा कधीही न येण्यासाठी.
खुप आठवण येते दोघांची. आमच्या तिघांची शेवटची दिवाळी दवाखान्यातच गेली. माझी आई धनत्रयोदशी ला पायऱ्या उतरताना पडली आणि एका पायाचे हाड मोडले जागेवरून हलणे शक्य नव्हते. मी सासरी होते मला लक्ष्मीपूजन पर्यंत माहित नाही पडू दिलं. दुसऱ्या दिवशी दवाखान्यात आईला असं लहान मुलासारखं रडताना पाहून खूप वाईट वाटलं. आईला डायबिटीस होता गोड तेलकट खायला नव्हतं सांगितलं डॉक्टरांनी. आईने लाडू करंजा खायला मागितल्यावर मी देत नव्हते पप्पा आणि भाऊ द्यायचे जे मागेल ते. त्यांना माहीत होतं आई लास्ट डेजला आहे आणि आता आई चांगली व्हायची शक्यता नाही. मला मात्र शेवटपर्यंत माहित नाही पडू दिल. भाऊबीज दिवाळी पाडवा बाहेर फटाक्यांचा आवाज आणि आम्ही वडील भाऊ मी एकमेकांना धीर देत होतो. एकमेकांचा आधार बनलो. खरंतर सगळेच मनाने खचून गेले होते. एकमेकांकडे बघून दोन घास खायचे. पुन्हा नॉर्मल चेहरे करून आईला जेवायला सांगायचं. आईला शुगर जास्त असल्याने जेवल्यावर लगेच भूक लागायची. मी चिडचिड करायचे. ऑपरेशन झाल्यावर पाय चांगला होईल मग आपण दिवाळी करू लाडू करंज्या देईल खायला. माझं स्वप्न स्वप्नच राहिलं. तेल पाणी वापरून खूप छान शंकरपाळी करायची मी तुप दूध टाकल तरी माझे चांगले नाही होत.दोन महिने माझ्याशिवाय कधी जेवली नाही त्या आईने मी सोबत नसताना जगाचा निरोप घेतला. शांतपणे निघून गेली मला न सांगता. ऑपरेशन नंतर शुगर वाढली म्हणून पुन्हा अर्जंट ऍडमिट करायला सांगितलं. आम्ही डबा नेला नव्हता बाजूच्या बेडवर एका मुस्लीम ताईने तिचं जेवण आणखी नातेवाईक जमवून बळचच दोन दोन घास खायला सांगितले. भूक कोणालाच नव्हती. कोण कुठली माणसं ना जातीची नाव नात्याची आधार अंधारात चमकून जातात आणि माझी माझी म्हणून जपलेली माणसं वेळेवर लायकी दाखवतात. टेन्शन नही लेणेका तुम नही खाओगी तो मम्मी पापा नही खायेंगे असं बोलणारी ती मुसलमान ताई आज जाती-जातीत भांडण लावून देणारा समाज वेगळा असावा. काय पाहिजे असतं दुःखात माणसाला धीराचे चार शब्द आधार हवा असतो. पैसा पैसा सगळीकडे पैसा कमी कामी येत नाही. आई वडील हरवलेल्या सर्व चिमणी पाखरांना दिवाळीच्या शुभेच्छा.
मन धीट करा
खंबीर रहा ज्यांना आई-वडील आहेत त्यांनी जपा.
सोडून गेलेले आई-वडील पुन्हा तर येऊ शकत नाही देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो.
(माझ्या सर्व चिमणी पाखरांना समर्पित.)

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button