क्राईम

महायुती सरकारच्या काळात मुली असुरक्षीत

खा.रजनीताई पाटील यांचे प्रतिपादन

 

(लाडकी बहीण फक्त नावालाच)
———————
बदलापुरची घटना अद्याप विसरली नाही तो वर बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील एका साडे पाच वर्षाच्या चिमुरडीवर झालेला अत्याचार हा अतिशय किळसवाणा व निच पणाचा कहर आहे. शिक्षण, शिक्षक व शैक्षणिक परिसर हे पवित्र मानले जातात मात्र सद्या हे उलट होताना दिसत आहे.
एकीकडे सरकार लाडकी बहीण योजना देऊन महिलांना खुश करण्याचा प्रयत्न करत असले तरी प्रत्यक्षात राज्यातील बहिणीवर किती अत्याचार होत आहेत मागच्या काही महिन्यांपासून अत्याचाराच्या किती घटना घडत आहेत हे देखील सरकारमध्ये असलेल्या सत्ताधाऱ्यांनी चिंतन करावे. महाराष्ट्रात दररोज अशा अनेक घटना समोर येत असताना राज्य सरकार मात्र याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. महायुतीच्या सरकारने महिलांच्या सुरक्षेकडे लक्ष देणे अपेक्षित आहे मात्र केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे सरकार फक्त आणि फक्त राजकारण करत आहे मात्र अतिशय लहान, अल्पवयीन मुली, स्त्रिया सद्या असुरक्षित आहेत. 25 ते 28 सप्टेंबर च्या दरम्यान ही अमानुष घटना घडली असून याचा एक महिला म्हणून तसेच काँग्रेस पक्षाचा वतीने जाहीर निषेध करते व या मद्ये असणाऱ्या आरोपीला कडक शासन व्हावे व जेणे करून अस काही करणाऱ्या नराधमाना कायद्याचा धाक राहिला पाहिजे. ही राज्य सरकारकडून अपेक्षा आहे.

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button