Uncategorized
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची पवन चक्कीच्या खंडणीच्या वादातुन निर्घून हत्या
उपअधिक्षक व पोलीस निरिक्षक यांची तातडीने बदली करण्याची मागणी

केज – (दि.०९) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास संतोष देशमुख यांचे टोलनाका जवळून अपहरण झाले होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष देशमुख हे त्यांच्या चारचाकी वाहनातून (एमएच ४४ बी ३०३२) मामेभाऊ शिवराज लिंबराज देशमुख यांच्यासह मस्साजोगकडे जात होते. मार्गात डोणगाव टोलनाका जवळ चारचाकी वाहनातून आलेल्या आलेल्या व्यक्तींनी त्यांची गाडी अडवली. त्या गाडीतून उतरलेल्या सहा जणांनी संतोष देशमुख यांच्या गाडीची तोडफोड करून त्यांना ओढून काठीने मारहाण केली आणि नंतर त्यांना बळजबरीने गदिन बसवून केजच्या दिशेने घेऊन गेले असल्याची तक्रार केज पोलीस ठाण्यात शिवराज देशमुख यांनी दिली. सदर तक्रारीवरून सहा व्यक्तींवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांची दोन पथके तातडीने देशमुख यांच्या शोधासाठी निघाली. मात्र काही वेळानंतर दैठणा गावाच्या रस्त्यावर संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या शरीरावर इतकी मारहान झालेली होती की न बघण्यापलीकडी होती या मारहानी मुळे जाग्यावर त्याचा मुत्यु झाला केज पोलीस पुढील तपास करत असून त्यानंतरच अधिकृत माहिती समोर येऊ शकेल. संतोष देशमुख हे त्यांच्या अनेक चांगल्या कार्यामुळे तालुक्यात परिचित आहेत. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात मस्साजोग ग्रामपंचायतला अनेक पुरस्कार मिळवून दिले. त्यांच्या मृत्यूमुळे तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
केज तालुक्यात या दहशतीमुळे वातावरण तंग आहे
◆◆◆◆◆



