क्रीडा

कुमारी दिपाली पाटील,एैश्वर्या घुले यांची मैदानी खेळासाठी राज्यस्तरीय स्पर्धेत निवड

स्वामी विवेकानंद शाळेच्या विद्यार्थी

केज:- दि. ३१ ऑक्टोबर- जीवन विकास शिक्षण मंडळ केज संचलित, स्वामी विवेकानंद विद्यामंदिर माध्यमिक विभाग या शाळेतील कु. दिपाली पाटील व ऐश्वर्या घुले या खेळाडूंनी छत्रपती संभाजी नगर गारखेडा क्रीडा संकुल या ठिकाणी झालेल्या विभागीय मैदानी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले.

केज येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर माध्यमिक विभाग या शाळेने आजपर्यंत अनेक खेळाडू घडविले. त्यामध्ये या शाळेचे राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये एकूण १११ तर राष्ट्रीय पातळीवर ९ खेळाडूंचा सहभाग आहे त्यामध्ये या शाळेला २ वेळेस देशपातळीवर गोळा फेक या क्रीडा प्रकारात ब्रॉन्झ मेडलही मिळाले आहे. दि. २८ ऑक्टोबर २०२४ रोजी छत्रपती संभाजी नगर गारखेडा क्रीडा संकुल या ठिकाणी पार पडलेल्या विभागीय मैदानी स्पर्धेत या शाळेच्या कु. दिपाली भीमाशंकर पाटील हिने १४ वर्षे वयोगटातून तर ऐश्वर्या बप्पाजी घुले हिने १७ वर्ष वयोगटातून गोळा फेक या क्रीडा प्रकारांमध्ये या दोघींनीही विभागातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तसेच रत्नागिरी या ठिकाणी होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये वरील दोन्ही खेळाडू संभाजीनगर विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

वरील यशस्वी खेळाडूंना शाळेतील क्रीडाशिक्षक श्री. श्रीकिशन नेहरकर सर यांचे मार्गदर्शन लाभले.

वरील खेळाडूंच्या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी व  शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शैलाताई इंगळे, शाळेच्या मुख्याध्यापिका शिवनंदा मुळे तसेच शाळेतील सर्व शिक्षकवृंद यांनी अभिनंदन केले तसेच पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button