Uncategorized

आयुष्याची अखेरपर्यंत मातीची सेवा करणाऱ्या ज्येष्ठ शेतकरी शंकरराव (आण्णा) सत्वधर यांचे निधन; एका निष्ठावंत शेतकऱ्याला अश्रूंनी निरोप

केज येथील ज्येष्ठ शेतीनिष्ठ शेतकरी शंकरराव (आण्णा) सत्वधर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; शहरात हळहळ

केज (प्रतिनिधी):-जुने केज परिसरातील ज्येष्ठ व जुने-जाणते शेतीनिष्ठ शेतकरी शंकरराव (आण्णा) निवृत्तीराव सत्वधर (वय ८० वर्षे) यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण केज शहरासह परिसरात तीव्र शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या केज शहरातील हनुमान गल्ली येथील रहिवासी असलेले शंकरराव सत्वधर हे आज नेहमीप्रमाणे पहाटे शेतात गेले होते. तेथून दूध काढून घरी परतल्यानंतर त्यांनी डेअरीवर दूध घातले. सकाळी ९ वाजता जेवण करून ते घरीच थांबले होते. याच दरम्यान त्यांना छातीत अस्वस्थ वाटू लागले होते, मात्र त्यांनी ही बाब कोणासही न सांगता शेतात जाणे टाळले व घरीच विश्रांती घेतली.

दुपारी सुमारे १:३० वाजण्याच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. परिस्थिती लक्षात येताच त्यांच्या पत्नीने मदतीसाठी टाहो फोडला. हा आवाज ऐकून त्यांचे पुतणे राजाभाऊ सत्वधर यांनी तातडीने धाव घेत त्यांना डॉ. बाळासाहेब अस्वले यांच्या रुग्णालयात नेले; मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. एका कष्टाळू आणि मातीशी नाळ जोडलेल्या ज्येष्ठ शेतकऱ्याच्या अशा अचानक जाण्याने जुन्या केज शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, डॉक्टर नातवंडे व सुना असा मोठा परिवार आहे. कै. शंकरराव (आण्णा) सत्वधर यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ५:०० वाजता सोनिजवळा रोडवरील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button