Uncategorized

धडाकेबाज कारवाई! जिल्हाधिकारी अविनाश पाठकचा ‘माज’ उतरवला; आयपीएस अधिकाऱ्याचा चापट लगावून पहाटे ४ वाजता अटकेचा थरार !

प्रशासकीय वर्तुळात भूकंप! 'मी जिल्हाधिकारी आहे' म्हणणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्याला पोलिसांनी खेचून बाहेर काढले; अटक नाट्य उघड!

बीड/नांदेड/लातूर :-राज्यातील प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या भूसंपादन घोटाळा प्रकरणी अखेर मोठी कारवाई झाली आहे. जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक (IGP) शहाजी उमाप यांच्या थेट मार्गदर्शनाखाली पहाटे ४ वाजता एका अत्यंत गोपनीय आणि थरारक मोहिमेद्वारे अटक करण्यात आली.

वॉर रूममधून ‘गेम प्लॅन’; आयपीएस व्यंकटरामन यांची धडक कारवाई

या हायप्रोफाईल अटकेची सूत्रे स्वतः शहाजी उमाप यांनी हलवली. स्थानिक पोलिसांना किंवा कोणालाही माहिती मिळू नये, यासाठी उमाप रात्रीपासून वॉर रूममध्ये ठाण मांडून बसले होते. आरोपी हा आयएएस दर्जाचा वरिष्ठ अधिकारी असल्याने अत्यंत सावधगिरी बाळगण्यात आली.

पहाटे ४ वाजताच्या सुमारास जेव्हा पाठक यांच्या घराचे दिवे लागले, तेव्हा रात्रभर दबा धरून बसलेल्या पोलिसांनी हालचाली सुरू केल्या. प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी व्यंकटरामन यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. पाठक घराबाहेर पडले व घरात निघून गेले घराचा दरवाजा उघडा असल्याचे पाहून पोलीस पथकाने त्यांच्यावर झडप घातली आणि त्यांना ताब्यात घेतले.

“मी जिल्हाधिकारी आहे…” म्हणताच पोलिसांचा धडाका

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अटकेच्या वेळी अविनाश पाठक यांनी पोलिसांना जोरदार विरोध केला. “मी जिल्हाधिकारी आहे, तुमची हिम्मत कशी झाली? तुम्ही कोण?” अशा भाषेत त्यांनी अरेरावी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी आयपीएस व्यंकटरामन यांनी पाठक यांच्या चेहऱ्यावर एक जोरदार धडाका लगावला, ज्यामुळे त्यांचा सत्तेचा माज क्षणार्धात उतरला.
छातीत दुखण्याचा बनाव फसला
अटकेनंतर घाबरलेल्या पाठक यांनी तातडीने छातीत दुखत असल्याचा ‘कागावा’ (बनाव) केला. पोलिसांनी तत्काळ त्यांना सरकारी दवाखान्यात नेले. मात्र, तेथे करण्यात आलेला ईसीजी (ECG) रिपोर्ट नॉर्मल आल्याने त्यांचा हा प्रयत्न फसला. सकाळी ८ वाजेपर्यंत दवाखाना परिसरात या भ्रष्टाचारावर पोसले गेलेले काही लाभार्थी तोंडाला मास्क लावून फिरताना दिसले, मात्र पोलिसांचा कडक बंदोबस्त पाहून कोणाचीही जवळ जाण्याची हिंमत झाली नाही.
घराची झडती आणि महत्त्वाचे पुरावे जप्त
अटकेनंतर पोलिसांनी अविनाश पाठक यांना बीड येथे नेले. त्यांच्या लातूरच्या घराची कसून झडती घेण्यात आली असून, या कारवाईत भूसंपादन घोटाळ्याशी संबंधित:
• महत्त्वाची कागदपत्रे
• लॅपटॉप आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे
• काही संशयास्पद जमिनीचे व्यवहार असलेली कागदपत्रे
पोलिसांनी हे सर्व साहित्य जप्त केले आहे. या कारवाईमुळे महसूल विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून, या घोटाळ्याचे धागेदोरे आणखी कोणापर्यंत पोहोचतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button