संपादकीय

केज शहरात नेते मंडळीचा मोठा फौजफाटा आसताना केज शहराचा विकास कुठे हरवला.

जनतेने विकासाबाबत सजग राहण्याची गरज

केज:~केज शहरात ग्रामपंचायत विसर्जित होऊन नगरपंचायत २००९ ला आस्तित्वात आली तेव्हा पासुन केज शहरातील जनता टॅक्स भरुन त्रस्त,नगरपंचायत झाली म्हणुन शेतकरी त्रस्त,यामधे केज मधील सर्व पक्षीय नेते मंडळी विकास करण्यापेक्षा एकमेकावर कुरघोडी करण्यातच व्यस्त दिसत आहे यामधे जनता मात्र भरडुन निघत आहे यामधे एसटी बसस्टॅन्ड चा विषय असो की जिरायत खात्याच्या जमिन,नगरपंचायतची ईमारत, सार्वजनिक विश्रामग्रह, महसुली कर्मचारी यांना घरे नाहीत मोकळ्या शासकिय जमिनीवर होत आसलेले अतिक्रमन विस्तारीत पाणी पुरवठा योजना,अजून केज शहरातील ५०%भागात अजूनही पाणीपुरवठा होत नाही तरीही केज नगरपंचायत या भागातील नागरिकाकडून पाणी टॅक्स वसुल करते केज नगरपंचायतच्या मालकीची साधी बालवाडी पन नाही तरीही शिक्षण कर वसुल करते आवाढव्य मालमत्ता कर नगरपंचायत वसुल करते तरीही आजही केज शहरातील जनता नालीपाणी रस्ते यासाठी झगडताना दिसते मग या परिस्थितीला जवाबदार कोन असा प्रश्न निर्माण होते मग केज शहराचा कारभार करण्यासाठी अग्रेसर आसणारे खासदार ताई, बप्पा, आमदार ताई आडसकर साहेब मार्केट कमिटीचे सभापती इंगळे आण्णा हारुनभाई इनामदार रणजितसिंह पाटील साहेब सुरेश तात्या पाटील नगराध्यक्ष सर्व पक्षीय नगरसेवक इतक्या नेते मंडळीचा फौजफाटा अहोरात्र तैनात आसताना केजचा विकासाबाबत हे नेतेमंडळी गप का बसतात हे न उलगडणारे कोडे आहे सर्व नेते मंडळीना आवाहन करतो की निवडणुकीपुरते सर्वानी राजकारण करावे बाकीच्या वेळी विकास करावा आप आपल्या परीने निधी आणावा तो केज शहरात खर्च करावा या कामासाठी सर्व सामान्य जनता तुमच्या सोबत राहील.

मैत्री दिनाच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button