Uncategorized

‘लग्न’ झाले पण ‘मनं’ जुळलीच नाहीत! कौटुंबिक युद्धाच्या आगीत भस्मसात झाला एक होतकरू तरुण; आता तरी बदलायचा का दृष्टिकोन?

रोजची कुरकुर, जिवावर बेतली

केज हादरले! घरगुती कलह व अंतर्गत ताणातून प्रसिद्ध व्यापारी आनंद गोपालदास काकाणी यांची आत्महत्या

केज (मंगळवार पेठ):-केज शहरातील मंगळवार पेठेतले परिचित आणि सेवाभावी व्यापारी आनंद गोपालदास काकाणी यांनी टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केल्याची अत्यंत दुःखद घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे केज शहरात व व्यापारी वर्गात मोठी शोककळा पसरली आहे.

पार्श्वभूमी व व्यावसायिक संघर्ष

गोपालदास काकाणी हे गेल्या पन्नास वर्षांपासून मंगळवार पेठेत रॅाकेल बत्ती, दुरुस्ती आणि त्यानंतर गॅस बत्तीचे दुकान चालवून आपला व्यवसाय करत असत. त्यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा आनंद काकाणी यांनी हा पारंपारिक व्यवसाय यशस्वीपणे पुढे चालवला. केज बस स्थानकात कुरिअर सेवा सुरू केली होती, मात्र परिवहन महामंडळाच्या अटींमुळे ती बंद झाल्यानंतरही त्यांनी मंगळवार पेठेतील दुकानातून खाजगी कुरिअर सेवा आणि गॅस बत्ती दुरुस्ती केंद्र अविरत सुरू ठेवले होते. केज शहरात प्रत्येकाला सेवा देणारा एक मनमिळाऊ तरुण म्हणून त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली होती. आनंद काकाणी यांच्या पश्चात आई, पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.

कौटुंबिक कलह आणि अंतर्गत वाद

आनंद काकाणी यांचा आंतरजातीय विवाह धारूर येथील राजपूत कुटुंबातील मुलीशी झाला होता. मात्र, मागील काही वर्षांपासून घरातील कौटुंबिक वातावरण बिघडले होते. आई आणि पत्नीमध्ये सातत्याने होणारा कलह आणि घरगुती कुरकुरीमुळे आनंद प्रचंड मानसिक तणावाखाली होते. यातून स्वतःला सावरण्याचा त्यांनी अनेकदा प्रयत्न केला, परंतु वाद थांबण्याचे नाव घेत नव्हते.
मिळालेल्या माहितीनुसार, पत्नी राजपूत समाजातील असल्याने तिच्या माहेरून (भावाकडून) फोनवरून धमक्या दिल्या जात असल्याचाही अंतर्गत तणाव होता. यापूर्वीही दोन वर्षांपूर्वी त्यांनी विषारी औषध प्राशन करून टोकाचं पाऊल उचलले होते, त्यावेळी ते सुदैवाने बचावले होते. परंतु, घरगुती कलह आणि मानसिक कोंडी संपत नसल्याने अखेर त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलले.

एक सामाजिक वास्तव व संदेश

या दुर्दैवी घटनेने समाजासमोर एक गंभीर प्रश्न उभा केला आहे. आंतरजातीय विवाह करताना केवळ दोन व्यक्तींचे जुळणे पुरेसे नसते, तर दोन्हीकडील कुटुंबांचे मन जुळणे आणि परस्पर आदर असणे अत्यंत गरजेचे असते. परिस्थितीचा ताण झेलत कुटुंबाचा सांभाळ करणाऱ्या एका होतकरू आणि सेवाभावी तरुणाचा असा अंत होणे संपूर्ण समाजासाठी विचार करायला लावणारे आहे.

आनंद गोपालदास काकाणी यांच्या अकाली आणि दुर्दैवी निधनाबद्दल व्यापारी वर्ग आणि शहरातून तीव्र शोक व्यक्त होत आहे.

आनंद गोपालदास काकाणी यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button